Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12th Results: निकालाचे फटाके लवकरच फुटणार! पोरांनो निकालानंतर ‘ही’ कागदपत्रं जीवापेक्षा जास्त जपा

निकालानंतर अर्थातच तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तयारी सुरु करणार. कुठल्या पदवीसाठी शिक्षण घ्यायचं याचा विचार तर आत्तापासून करणं गरजेचंच आहे पण प्रवेशासाठी काय कागदपत्र गरजेची असतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

12th Results: निकालाचे फटाके लवकरच फुटणार! पोरांनो निकालानंतर 'ही' कागदपत्रं जीवापेक्षा जास्त जपा
पोरांनो निकालानंतर 'ही' कागदपत्रं जीवापेक्षा जास्त जपा Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:50 AM

जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे (Results) लागून होतं. वास्तविक पाहता यावेळी बारावीच्या परीक्षेपासूनच अनेक अडचणींचा सरकारला, विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गाला सामना करावा लागतोय. मग त्यात शिक्षकांनी पेपर चेकिंगवर (Paper Checking) टाकलेला बहिष्कार असो, विद्यार्थ्यांचं परीक्षा ऑफलाईन घ्या असं म्हणत केलेलं आंदोलन असो. इतक्या सगळ्या अडचणीत सुद्धा निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलंय. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे.

प्रवेशासाठी काय कागदपत्र गरजेची

कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोनासारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे. निकालाचं काहीही होऊ पण पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. निकालानंतर अर्थातच तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तयारी सुरु करणार. कुठल्या पदवीसाठी शिक्षण घ्यायचं याचा विचार तर आत्तापासून करणं गरजेचंच आहे पण प्रवेशासाठी काय कागदपत्र गरजेची असतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रवेश कुठच्याही पदवीसाठी असू खालील कागदपत्रं ही अत्यंत महत्त्वाची आहेत.

निकालानंतर ‘ही’ कागपत्रं आवश्यक

  1. गुणपत्रिका (Board Marksheet)
  2. स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate)
  3. हे सुद्धा वाचा
  4. आधार कार्ड (Aadhar card)
  5. जातीचा दाखला (Caste Certificate)
  6. रहिवासी दाखला (Address Proof)
  7. उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)
  8. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  9. पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

कसा चेक करणार रिझल्ट? ही प्रोसेस फॉलो…

  • विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
  • यानंतर तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • तुमच्या निकालाची प्रत तुमच्याकडेच ठेवा
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.