HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल
इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल अखेर लागला आहे. यंदा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. यंदा 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. (Maharashtra HSC Result 2021)
पुणे: इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल अखेर लागला आहे. यंदा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. यंदा 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. तर 46 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं. (Maharashtra Board Class 12 Result Declared With 99.63% Pass Percentage)
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्यात 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच 91, 435 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच 1372 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.
इयत्ता बारावीचा निकाल :
एकूण निकाल 99.63 टक्के विज्ञान – 99.45 टक्के कला – 99.83 टक्के वाणिज्य 99.81 टक्के एमसीव्हीसी – 98.8 टक्के
कुणाचा निकाल किती?
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के यंदाच्या निकालातही मुलींची बाजी. मुलींचा निकाल 99.81 टक्के तर मुलांचा निकाल 99.54 टक्के यावर्षीचा निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के, यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त कला शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 82.63 टक्के होता, यंदा हा निकाल 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त वाणिज्य शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 91.27 टक्के होता, यावर्षी 99.91 टक्के निकाल लागला. हा निकाल 8.64 टक्क्यांनी जास्त आहे. एमसीव्हीसीचा मागील वर्षाचा निकाल 86.07 टक्के होता, यावर्षी 98.80 टक्के आहे, हा निकाल 12.73 टक्क्यांनी जास्त आहे.
बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?
स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल (Maharashtra Board Class 12 Result Declared With 99.63% Pass Percentage)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 August 2021 https://t.co/8K63KbGSd2 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra HSC Result 2021 LIVE Updates: बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला, दिनकर पाटील यांची माहिती
तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार
(Maharashtra Board Class 12 Result Declared With 99.63% Pass Percentage)