AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

icai ca inter result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं पाहायचा?

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने सीए इंटरचा निकाल जाहीर केला आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या रोजी जाहीर करण्यात आला आहे.

icai ca inter result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं पाहायचा?
CA Course
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 3:10 PM

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने सीए इंटरचा निकाल जाहीर केला आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या रोजी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर icai.org वर भेट देऊन निकाल पाहू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, जुलै 2021 मध्ये आयोजित चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट परीक्षा (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) चे निकाल उमेदवार icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.

ईमेलवरही निकाल उपलब्ध होणार

उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरही निकाल मिळू शकतो, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट देऊन 17 सप्टेंबरपासून नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागताच त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल.

ICAI CA Result 2021 या स्टेप्स करा चेक

स्टेप 1 : उमेदवार अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर भेट द्या. स्टेप 2 : आता वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर विनंती केलेली माहिती सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा

CA ची फाउंडेशन, इंटर आणि फायनल परीक्षांसाठी नोंदणी सुरू

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने डिसेंबर सत्रातील CA परीक्षा 2021 साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. फाउंडेशन, इंटरमीडिएट (आयपीसी), इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. जे उमेदवार नोंदणी करू इच्छितात ते icaiexam.icai.org वर ICAI च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

ICAI CA परीक्षा 2021 परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी?

उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

स्टेप 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर जा. स्टेप 2 : नंतर वेबसाईटवर दिलेल्या नोंदणीसाठी दुव्यावर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. स्टेप 4 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. स्टेप 5 : फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा. स्टेप 6 : त्यानंतर अर्ज फी सबमिट करा. स्टेप 7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. (Announce the result date of old and new courses, check details here)

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आणि विलंब शुल्क 600 रुपये भरावे लागतील. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आणि विलंब शुल्क 10 अमेरिकन डॉलर आहे.

इतर बातम्या

Television Celebrities : कपिल शर्मापासून दिव्यांका त्रिपाठीपर्यंत हे 7 सेलेब्स एका एपिसोडमधून करतात लाखोंची कमाई

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी 3 पर्वाची सुरुवात ग्रँड प्रीमिअरनं होणार, कुठे आणि किती वाजता पाहायचे एपिसोड

ICAI CA Inter Result 2021 icai declared July Intermediate result today on caresults.icai.org, icai.nic.in

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....