AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced साठी नोंदणी आजपासून सुरू, अर्ज कसा करावा? जाणून घ्या

तुम्ही JEE परीक्षा देणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. JEE Advanced 2025 साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. उमेदवार jeeadv.ac.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. ही परीक्षा CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे.

JEE Advanced साठी नोंदणी आजपासून सुरू, अर्ज कसा करावा? जाणून घ्या
JEE Advanced Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 23, 2025 | 7:44 PM

तुम्ही JEE Advanced परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, JEE Advanced 2025 साठी नोंदणी प्रक्रिया आज, 23 एप्रिलपासून सुरू केली आहे. महिला उमेदवार आणि एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरू शकतात. चला तर मग या JEE Advanced 2025 परीक्षेची संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा भरावा, याविषयी पुढे जाणून घेऊया.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), कानपूरने JEE Advanced 2025 साठी नोंदणी प्रक्रिया आज, 23 एप्रिलपासून सुरू केली आहे. उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. JEE Advanced 2025 मेन्समध्ये अव्वल क्रमांक मिळवणारे उमेदवार 2 मेपर्यंत jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तर, नोंदणीकृत उमेदवार 5 मे पर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतात.

JEE Advanced 2025 साठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 3200 रुपये निश्चित करण्यात आले आहे. महिला उमेदवार आणि एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरू शकतात.

हे सुद्धा वाचा

JEE Advanced 2025 नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?

  • JEE Advanced 2025 jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर दिलेल्या रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.
  • फोन नंबर, मेल ID इत्यादी टाकून नोंदणी करा.
  • अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • फी सबमिट करा आणि सबमिट करा.
  • JEE Advanced 2025 अधिसूचना उमेदवार या लिंकवर क्लिक करून जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2025 अधिसूचना पाहू शकतात.

JEE Advanced 2025 परीक्षा कधी आयोजित केली जाईल?

JEE Advanced 2025 परीक्षा 18 मे रोजी IIT कानपूरने देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या सर्व यशस्वी नोंदणीकृत अर्जदारांना 11 मे रोजी प्रवेशपत्र देण्यात येईल, जे उमेदवार आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे डाउनलोड करू शकतील.

JEE Advanced 2025 ही परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतील. प्रत्येकाला तीन तासांचा अवधी असेल. उमेदवारांना दोन्ही पेपर द्यावे लागतील. प्रत्येक पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स असे तीन विभाग असतील. अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.