JEE Advanced Result 2023 चा रिझल्ट जारी, ही आहे डायरेक्ट लिंक!
यंदा JEE Advanced Result 2023 दोन्ही पेपरमध्ये 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.
मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने जेईई ॲडव्हान्स्ड 2023 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचा निकाल पाहण्यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट – jeeadv.ac.in जाऊन iitg.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळेल.
यंदा JEE Advanced Result 2023 दोन्ही पेपरमध्ये 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.
JEE Advanced Result 2023 कसा तपासावा
- स्टेप 1: जेईई ॲडव्हान्स्ड रिझल्टसाठी सर्वप्रथम वेबसाइटवर जा – jeeadv.ac.in.
- स्टेप 2: स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3: लॉगिन करण्यासाठी आवश्यक क्रेडेंशियल्स प्रविष्ट करा.
- स्टेप 4: एकदा यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, उमेदवार त्यांचे स्कोअर कार्ड तपासू शकतील.
- स्टेप 5: डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या
JEE Advanced Result 2023 टॉपर
जेईई ॲडव्हान्स्ड 2023 मध्ये हैदराबाद झोनच्या Vavilala Chidvilas Reddy ने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 360 पैकी 341 गुण मिळाले. जेईई ॲडव्हान्स्ड 2023 परीक्षेतील टॉपर मुलगी देखील हैदराबाद झोनची आहे. 360 पैकी 298 गुण मिळवणारी नयकांती नागा भाव्या श्री ही महिला यंदा टॉपर ठरली आहे.