AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board 12th Result 2024 : उद्या जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल, ‘या’ दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मार्कशीट?

Maharashtra Board HSC Result 2024 : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आता निकालाबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट आले. उद्या म्हणजेच 21 मेला बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2024 : उद्या जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल, 'या' दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मार्कशीट?
12th results
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 5:20 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. उद्या (21 मे) बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. दुपारी एक वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. बारावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून काही वेबसाईट देखील देण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहताना दिसले. आता शेवटी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.

इयत्ता बारावीचा निकाल जरी उद्या लागणार असला तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मार्कशीट हातात पडण्यासाठी असून थोडी वाट पाहावी लागेल. निकाल लागल्यानंतर 10 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळू शकते. उद्या याबाबतची तशी घोषणा ही बोर्डाकडून केली जाणार आहे. निकालाच्या प्रत्येक अपडेटकडे विद्यार्थ्यांच्या नजरा आहेत.

mahresult.nic.in या साईटला जाऊन आपण निकाल पाहू शकतो. यासाठी सर्वात अगोदर आपल्याकडे परीक्षेच्या क्रमांक असणे आवश्यक आहे. Maharashtra SSC and HSC result येथे क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला परीक्षा क्रमांक, जन्म तारीख टाकून सबमिट करावे लागेल. Maharashtra board 12th results 2024 चा तुमचा निकाल दिसेल.

बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलीये. यामध्ये पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर याप्रमाणे. आपण mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन देखील बारावीचा निकाल पाहू शकता. यंदा राज्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान परीक्षा पार पडल्या.

राज्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाचे काम देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जातंय. आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालची प्रतिक्षा केली जातंय.

युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.