Maharashtra Board HSC Result 2023 : यंदा बारावी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के, मागील वर्षापेक्षा यंदा निकाल झाला कमी

Maharashtra Board HSC Result 2023 : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल लागला आहे. या निकालाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विद्यार्थ्यांना आज दुपारी २ वाजता बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तसेच कोकण विभाग अव्वल ठरला आहे.

Maharashtra Board HSC Result 2023 : यंदा बारावी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के, मागील वर्षापेक्षा यंदा निकाल झाला कमी
HSC Result
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 12:02 PM

प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यंदा बारावी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.

किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण

बारावीच्या परीक्षेत यंदा 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. कॉपीमुक्त अभियानाचा हा परिणाम आहे.

हे सुद्धा वाचा

कोकण विभागाची बाजी

बारावीच्या निकालात राज्यात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के लागला आहे.

राज्यात यंदाही मुलींची बाजी

निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला आहे.

भरारी पथके होती तैनात

यंदा परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी 271 भरारी पथकं तैनात केली होती. यामुळे यंदा गैरप्रकाराला आळा बसल्याचं दिसलं आहे. या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळात 14 लाख 28 हजार194 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील14 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता 12 लाख 92 हजार 468 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल 91.25 टक्के आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर करणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसले.

कुठे पाहता येईल निकाल ?

Maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.

निकालाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.