Maharashtra Board 12th Result 2023 LIVE at mahresult.nic.in | मुंबई विभागातून रायगड जिल्हा अव्वल, मुलींचीच बाजी

| Updated on: May 26, 2023 | 7:00 AM

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE : राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी ची परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने 12 वीचा निकाल महत्वाचा आहे.

Maharashtra Board 12th Result 2023 LIVE at mahresult.nic.in | मुंबई विभागातून रायगड जिल्हा अव्वल, मुलींचीच बाजी
EXAMImage Credit source: socialmedia

मुंबई : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये बारावीच्या परीक्षा झाल्या. आज  HSC परीक्षांचा निकाल जाहीर झाला  आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरच या निकालासंदर्भात माहिती मिळू शकते. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान झाल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने 12 वी चा निकाल महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी, पालकांचे इयत्ता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले असते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 May 2023 07:03 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2023| मुंबई विभागातून रायगड जिल्ह्याची बाजी

    बारावीचा निकाल जाहीर, एकूण निकाल हा 91.25 टक्के

    मुंबई विभागातून रायगड जिल्ह्याची बाजी

    रायगड जिल्ह्याचा 90.53 टक्के निकाल

    रायगडमध्येही मुलींचीच बाजी,

    मुलींची पास होण्याची टक्केवारी 93.59,

    तर 87.71 टक्के मुलं उत्तीर्ण

  • 25 May 2023 05:39 PM (IST)

    नागपूर : भूमिका बोदेलेचे बारावीत यश

    आर्ट विभागात ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण

    वडील ऑटोचालक, आई धुणी-भांडी करते

    स्वतः लहान मुलांना शिकवून बारावीत चांगले गुण

    स्वतःचा खर्च भागवून बारावीत घवघवित यश

  • 25 May 2023 05:15 PM (IST)

    बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के

    कॉमर्स विभागात वेदांत काकानी याने 97.66 टक्के गुण मिळवले

    विज्ञान शाखेत अनुरीम पौणिकर हिने 95.05 टक्के गुण पटकावले

    आर्ट शाखेत अनुष्का चवरे हिने 90.17 टक्के गुण मिळवले

    हे विद्यार्थी आंबेडकर कॉलेजमधील आहेत

    कॉलेजतर्फे या विद्यार्थ्यांचा सत्कार करऱ्यात आला

  • 25 May 2023 04:53 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

    हा पल्ला गाठताना पालक, कुटुंबियांचे पाठबळ महत्वाचे असते

    प्रत्येक विद्यार्थ्याच्या हे मेहनतीचे फळ आहे

    नापास विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रयत्न करावा- शिंदे

  • 25 May 2023 04:04 PM (IST)

    इयत्ता 12 वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा

    अजित पवार यांनी केले अभिनंदन

    शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचे केले कौतुक

    अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करण्याचा दिला सल्ला

  • 25 May 2023 03:42 PM (IST)

    लातूर विभागातही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

    लातूर विभागाचा 90.37 टक्के निकाल लागला आहे.

    लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश…

    लातूर विभागात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या 94.16 इतकी आहे, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.32 इतके आहे.

  • 25 May 2023 02:58 PM (IST)

    बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर

    बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर

    बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी बारावीत मिळवलं घवघवीत यश

    अभ्यासाचं टेन्शन घेतलं नाही, त्यामुळे चांगला रिझल्ट पाहायला मिळाला

    जवळपास 90 टक्क्यांच्यावरती विद्यार्थ्यांना मिळाले मार्क्स आहेत

  • 25 May 2023 02:57 PM (IST)

    पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी सौरव हेगडेनं बारावी परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

    पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी सौरव हेगडेनं बारावी परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

    सौरवला मिळाले 88 टक्के मार्क्स

    सौरवच्या यशानं आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे

    मी ऑडीओ ऐकून अभ्यास करत होतो असं सौरव हेगडे यांनी सांगितलं आहे.

    परीक्षेची भीती वाटली नाही, चांगला अभ्यास केला आणि त्याचं फळ मला मिळालं आहे असंही सौरवने सांगितले.

  • 25 May 2023 02:50 PM (IST)

    औरंगाबाद विभागातही बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीचं सरस

    औरंगाबाद विभागातही बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. बारावीच्या निकालात तब्बल 94.5% मुली पास झाल्या आहेत. तर ९०.३२ टक्के मुले पास झाले आहेत. यावर्षी बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून तब्बल एक लाख 64 हजार 545 विद्यार्थी बसले होते. यापैकी एक लाख 51 हजार 148 विद्यार्थी पास झाले आहेत. यात तर 63 हजार 631 इतके मुले बारावी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे औरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.

  • 25 May 2023 02:34 PM (IST)

    परभणी जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 86.94 टक्के

    परभणीः  जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 86.94 टक्के,

    बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून 23 हजार 956 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते,

    जिल्ह्यात एकूण 20 हजार 828 विद्यार्थी उत्तीर्ण झाले,

    औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.

  • 25 May 2023 02:32 PM (IST)

    पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले

    पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले

    थोड्या वेळात विद्यार्थी करणार जल्लोष

  • 25 May 2023 02:20 PM (IST)

    जुलै-ऑगस्ट 2023 पुढची परीक्षा

    ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे महाराष्ट्र इयत्ता 12 वीचे गुण 2023 मध्ये सुधारायचे आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र HSC पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेतल्या जातील.

  • 25 May 2023 02:16 PM (IST)

    हस्ताक्षरात बदल असलेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

    हस्ताक्षरात बदल असलेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

    396 विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर बदल प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय

    फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार

    हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

    मात्र मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

  • 25 May 2023 02:15 PM (IST)

    कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के

    कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के

    १२ वीच्या निकालात मुलींची बाजी

  • 25 May 2023 02:10 PM (IST)

    त्यांना जुलै-ऑगस्टमध्ये आणखी एक संधी मिळेल

    जे विद्यार्थी मुख्य बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे महाराष्ट्रातील सर्व एचएससी पेपर सोडू शकणार नाहीत. त्यांना जुलै-ऑगस्टमध्ये आणखी एक संधी मिळेल. तारखानंतर जाहीर केल्या जातील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुण सुधारण्यासाठी वर्ग सुधारणा योजना परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत.

  • 25 May 2023 02:09 PM (IST)

    महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२३ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे

    1. mahahsscboard.in
    2. mahresult.nic.in
    3. hscresult.mkcl.org
    4. hsc.mahresults.org.in
  • 25 May 2023 02:07 PM (IST)

    निकाल पाहण्यासाठी या लिंकवरती क्लिक करा

    महाराष्ट्र इयत्ता 12वी निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी आता थेट लिंक आहे, विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात.

    https://mahresult.nic.in/mbhsc2023/mbhsc2023.htm

  • 25 May 2023 02:02 PM (IST)

    बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर

    बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर

    ऑनलाईन निकाल या वेबसाईटवरती पाहा

    result live athttps://mahresult.nic.in/

  • 25 May 2023 01:57 PM (IST)

    पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले

    थोड्या वेळात विद्यार्थी करणार जल्लोष

  • 25 May 2023 01:25 PM (IST)

    बारावीचा विभागवार निकाल

    कोकण 96.01 टक्के पुणे 93.34 टक्के कोल्हापूर 93.28 टक्के औरंगाबाद 91.85 टक्के नागपूर 90.35 टक्के अमरावती 92.75 टक्के नाशिक 91.66 टक्के लातूर 90.37 टक्के मुंबई 88.13 टक्के

  • 25 May 2023 12:50 PM (IST)

    बारावीचा निकाल कुणाची बाजी? निकाल काय?

    यंदाचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे

    यंदाही मुलींनीचं बारावीच्या परिक्षेत बाजी मारली

    कोकण विभाग आघाडीवर आहे

    गेल्यावर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला

  • 25 May 2023 12:35 PM (IST)

    बारावीच्या निकालात यंदाही कोकण पहिल्यास्थानी

    बारावीच्या निकालात राज्यात यंदा कोकण विभागाची बाजी

    कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के इतका लागला आहे

    सर्वाधिक कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे 88.13 टक्के

    राज्यात यंदाही मुलींची बाजी

    मुलींचा निकाल 93.73 टक्के

    तर मुलांचा निकाल 81 टकके इतका लागला आहे

  • 25 May 2023 12:23 PM (IST)

    महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी

    17 एकुण कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा 0 टक्के लागला

    20 ते 30 टक्के 3 महाविद्यालय आहेत

    30 ते 40 – 3

    100 टक्के 2369 महाविद्यालय निकाल लागला आहे

    पेपर काळात 11 गुन्हे दाखल झाले आहेत

    पेपर गैरप्रकारामध्ये दाखल झाले आहेत

    डमी विद्यार्थी पुणे विभागात पकडला

    345 विद्यार्थी कॉपी करताना पकडले

    उत्तरपत्रिकेत रिकाम्या जागेत काही लिखाण केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला

    संभाजीनगरमध्ये झालेल्या गैरप्रकारत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे

    भौतिकशास्त्र या विषयात ओव्हररायटींग झालं होतं

  • 25 May 2023 12:10 PM (IST)

    यंदा कॉपीला आळा!

    परिक्षेच्या काळात राज्यात 271 भरारी पथकं तैनात होती

    त्यामुळे यंदा गैरप्रकाराला आळा बसल्याचं दिसलं आहे

    या परीक्षेत 9 विभागीय मंडळात 14 लाख 28 हजार194 विद्यार्थ्यांनी नोंदणी

    14 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

    12 लाख92 हजार 468 हजार एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले

    91.25 टक्के इतका निकाल आहे

  • 25 May 2023 11:21 AM (IST)

    Maharashtra Board Result 2023 : महाराष्ट्राचा 12 वी बोर्डाचा निकाल 91.25

    मुलींचा निकाल 93.73 टक्के

  • 25 May 2023 11:18 AM (IST)

    Maharashtra Board Result 2023 : कोकण विभागाचा निकाल यंदा 96.1 टक्के

    बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल

    सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा

    बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी

  • 25 May 2023 11:07 AM (IST)

    Maharashtra Board Result 2023 : अधीकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल

    12 बोर्डाचा निकाल आज लागणार

    12 वीच्या निकालाबद्दल बोर्डाची पत्रकार परिषद

    दुपारी दोन वाजता पाहता येणार निकाल

  • 25 May 2023 09:58 AM (IST)

    परकीय भाषा शिकता येईल

    बारावीनंतर परकीय भाषा शिकण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. देशातील विविध विद्यापीठात फ्रेंच, जपानी, पर्शियन, जर्मन, कोरियन स्टडिज, रशियन स्टडिज, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, लॅटिन अमेरिका भाषांचा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घेतले जातात.

  • 25 May 2023 09:55 AM (IST)

    बारावीनंतर हा चांगला अभ्यासक्रम

    बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. बी. फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करुन औषधनिर्माण कंपन्यांमध्ये जाता येते. तसेच स्वत:चे मेडिकल स्टोअर सुरु करता येते.

  • 25 May 2023 09:51 AM (IST)

    बारावीच्या निकालासाठी उरले काही तास

    राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल.मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. निकालासाठी आता काही तास उरले आहेत.

  • 25 May 2023 09:48 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : आज जाहीर होणार निकाल

    12 वी HSC बोर्डाचा आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होईल. त्याआधी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होईल.

  • 24 May 2023 03:08 PM (IST)

  • 24 May 2023 01:59 PM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

    Maharesult.nic.in

    hsc.maharesult.org.in

    hscresult.mkcl.org

  • 24 May 2023 01:58 PM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

  • 24 May 2023 01:42 PM (IST)

    उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

    दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल

  • 24 May 2023 11:34 AM (IST)

    सोहम मांढरेचं यूपीएससी परीक्षेत यश, देशात मिळवला 218 वा रँक

    दौंड तालुक्यातील पडवीच्या सोहम मांढरेचं यूपीएससी परीक्षेत यश

    देशात मिळवलं 218 वं स्थान

    मागेही यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांनी 267 वी रँक मिळवला होती

    त्याही पुढे जाऊन त्याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत गगन भरारी घेत यश संपादन केलंय

    जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे

    सोहमने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय

  • 24 May 2023 09:55 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

    महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

    महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषीत करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजीनल मार्कशीट कॉलेजमध्ये मिळतील.

  • 24 May 2023 08:45 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

    SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्स मध्ये जावून आपला सिट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

  • 24 May 2023 08:44 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : निकाल कुठे पाहता येईल?

    सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईट वर mahresult.nic.in पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पहाता येणार आहे.

  • 24 May 2023 08:42 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : निकालाची तारीख कधी जाहीर होणार?

    महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे पर्यंत निकालाची तारीख जाहीर करणार आहे.

  • 24 May 2023 08:29 AM (IST)

    Maharashtra board hsc ssc result : किती लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले ?

    महाराष्ट्रातून SSC च्या परीक्षेसाठी जवळपास 15 लाख आणि HSC परीक्षांसाठी 14 लाख विद्यार्थी बसले आहेत.

Published On - May 25,2023 8:27 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.