दहावी, बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी, कुठे मिळणार निकाल
Maharashtra Board 10th, 12th results : दहावी, बारावीची परीक्षा झाली आहे. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सीबीएसई आणि महाराष्ट्र बोर्डाचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. निकालासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट maharesults.mic.in वर विद्यार्थ्यांसाठी निकाल लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कधी लागणार निकाल
महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार २० मे पूर्वी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार ३१ मे पूर्वी दहावीचा निकाल लागणार आहे.
किती विद्यार्थी होते
दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
कुठे पाहाता येईल निकाल?
दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.mahahhscboard.in
सीबीएसईचा निकाल कधी
सीबीएसई बोर्डाने बुधवारी दहावी आणि बारावी परीक्षा 2023 चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला ६ अंकी पिन क्रमांक पाठविण्यात येणार आहे. पिन क्रमांक शाळांना पाठविला जाईल, जो शाळा विद्यार्थ्यांना देतील.
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. या परीक्षेसाठी 15.21 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेला सुमारे 10 लाख विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर टर्म 2 ची परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात आली होती. बोर्डाने दोन्ही टर्मचे गुण एकत्र करून निकाल जाहीर केला होता.