SSC Result website down : दहावी बोर्डाचा खेळखंडोबा सुरुच, 3 नव्या लिंक, मात्र त्या सुद्धा बंद, 16 लाख विद्यार्थी दिवसभर ताटकळत
Maharashtra SSC Result 2021 Declared : दहावीचा निकाल निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल, मात्र, दोन्ही वेबसाईट चार तासांहून अधिक वेळ डाऊन आहेत.
मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल, मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे. बोर्डानं सध्या आणखी तीन लिंक दिल्या आहेत. मात्र त्याही डाऊन असल्याचं समोर आलंय.
दहावीच्या निकालाची वेबसाईट अद्यापही काही ठिकाणी सुरु नाही. गेले साडेपाच तास वेबसाईट हँग झाली आहे. वेबसाईट सुरु कधी होणार यावर बोर्डाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दिनकर पाटील आणि टेक्निकल टीम नॅशनल इन्फर्मेशन सेंटर (एनआयसी) कडे रवाना झाले आहेत.
बोर्डानं दिलेल्या नव्या लिंक कोणत्या?
वेबसाईट डाऊन
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध झाला आहे.
अतुल भातखळकरांचा सरकारवर निशाणा
ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे SSc च्या निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल ते काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसतेय… pic.twitter.com/nllBen8ffo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 16, 2021
निकाल कुठे पाहणार?
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021) ?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
इतर बातम्या: