Maharashtra SSC Result 2023 Declared : इयत्ता दहावीचा निकाल पाहताना अडचणी?; विद्यार्थ्यांनो असा पाहा निकाल

यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च रोजी सुरू झाली. 25 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू होती. या परीक्षेसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या निकालातही विद्यार्थीनींनीच बाजी मारली आहे.

Maharashtra SSC Result 2023 Declared : इयत्ता दहावीचा निकाल पाहताना अडचणी?; विद्यार्थ्यांनो असा पाहा निकाल
SSC ResultImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 1:11 PM

पुणे : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीतबाजी मारली. मात्र, मुलांच्या निकालाचीही टक्केवारी चांगली आहे. थोड्याच वेळात दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येणार आहे. मात्र, ऑनलाईन निकाल लागल्यानंतर एकाचवेळी हजारो विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहणार असल्याने निकाल पाहताना अडचणी येऊ शकतात. कधी कधी संकेतस्थळ डाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाच संकेतस्थळावर निकाल पाहणे टाळले पाहिजे. त्यासाठी इतर संकेतस्थळांचाही वापर करा. म्हणजे निकाल पाहताना काहीच अडचणी येणार नाहीत.

हे आहेत पर्याय

mahahsscboard.in

हे सुद्धा वाचा

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

https://ssc.mahresults.org.in

http://sscresult.mkcl.org

असा निकाल चेक करा

अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in वर जा

SSC Result 2023साठी लिंकवर क्लिक करा

सीट नंबर टाका, आईचे नाव टाका

निकालाची प्रत तुमच्या ऑनलाईन स्क्रिनवर दिसेल

गुण पडताळणी अर्ज कुठे कराल?

http://verification.mh-ssc.ac.in

तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के?

पुणे 95.64% मुंबई 93.66% औरंगाबाद 93.23% नाशिक 92.22% कोल्हापूर 96.73% अमरावती 93.22% लातूर 92.66% नागपूर 92.05% कोकण 98. 11%

पोरीच नंबर वन

राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदा दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे.

सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले

यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च रोजी सुरू झाली. 25 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू होती. या परीक्षेसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 8 लाख 44 हजाराहून अधिक विद्यार्थी आणि 7 लाख 33 हजाराहून अधिक विद्यार्थींनीनी यावेळी परीक्षा दिली होती.

साडे सहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के

एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामिगीरी सरस ठरली आहे. मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला.

फर्स्ट क्लास आणणारे अधिक

एकूण 4,89,455 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. तर 526210 विद्यार्थाी फर्स्ट क्लासममध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 334015 विद्यार्थ्यांना सेकंड क्लास आणि 85298 विद्यार्थ्यांना थर्ड क्लास मिळाला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.