AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET 2021 Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षा PCM प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रेवश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधित होणार आहेत.

MHT CET 2021 Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षा PCM प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
MHT CET Cell
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:54 AM

MHT CET 2021 Admit Card मुंबई: शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठीच्या पीसीएम ग्रुपचं प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रेवश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधित होणार आहेत. आजपासून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांना सुरुवात होत आहे.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे ?

♦ cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जा

♦ तुम्ही ज्या सामायिक परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे, त्या परीक्षेसमोरील प्रवेश पत्राच्या ऑप्शनवर क्लिक करा

♦ अर्ज क्रमांक तसेच जन्मतारीख टाकून लॉगिन करा

♦ लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र समोर दिसेल

♦ हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्या. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.

आठ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून आणखी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.  तर 14 टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल. अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टोबर नंतर सुरु करण्यात येणार आहे.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

  1. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
  2. मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
  3. बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होणार आहेत.
  4. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष),बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.
  5. बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021,
  6. बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.
  7. बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

20 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार

या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

इतर बातम्या :

MHT CET 2021: एमएचटीसीईटी परीक्षेची नोंदणी पुन्हा सुरु, उदय सामंत यांची माहिती

MHT CET 2021 Registration | एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्जनोंदणीला सुरुवात, mhtcet2021.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज

maharashtra cet 2021 admit card 2021 released for PCM Exam on Cetcell Mahacet org c know all details here

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....