AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Counselling 2021: महाराष्ट्र सीईटी सेलकडून नीट समुपदेशनासाठी नवं पोर्टल, आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर

महाराष्ट्र सरकारच्यावतीनं NEET राज्य कोटा समुपदेशनासाठी वेबसाइट सुरू करण्यात आलीय आहे.

NEET Counselling 2021: महाराष्ट्र सीईटी सेलकडून नीट समुपदेशनासाठी नवं पोर्टल, आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर
Neet
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:53 PM

Maharashtra NEET Conselling 2021 मुंबई: राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ( NEET UG 2021) उत्तीर्ण झालेले लाखो विद्यार्थी आता एमबीबीएस आणि बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसात अखिल भारतीय 15% टक्के कोटा समुपदेशन वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केले जाईल. मात्र, या त्यासंदर्भातील तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु, महाराष्ट्र सरकारच्यावतीनं NEET राज्य कोटा समुपदेशनासाठी वेबसाइट सुरू करण्यात आलीय आहे.

पोर्टल सुरु

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नीटद्वारे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी केंद्रीय समुपदेशन प्रक्रिया पोर्टल सुरू केले आहे. info.mahacet.org/CAP2021/NEET_UG या पोर्टलला भेट देऊन विद्यार्थी गेल्या वर्षीचा वर्षाचा कट ऑफ, यावर्षी NEET समुपदेशनासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी आणि इतर माहिती मिळवू शकतात. NEET समुपदेशन वेळापत्रक 2021, माहितीचं बुलेटिन सध्या जारी करण्यात आलेलं नाही.

NEET Counselling 2021: आवश्यक कागदपत्रे

नीट प्रवेशपत्र, mahacet.org वर भरलेल्या अर्जाची प्रवेशपत्र प्रत, नीट 2021 गुणपत्रक, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, दहावी आणि बारावी गुणपत्रक, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. वर नमूद केलेली कागदपत्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. याशिवाय, आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारने जारी केलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, 31 मार्च 2022 पर्यंत वैध असणारे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमदेवारांसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक नाही.

दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांकडं NTA किंवा MCC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपंगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वेबसाईटवर प्रमाणित वैद्यकीय मंडळांची यादी पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण प्रमाणित वैद्यकीय मंडळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

महाराष्ट्र NEET UG समुपदेशनातील इतर सर्व आरक्षणांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

NEET UG 2020 द्वारे महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशासाठी कट ऑफ लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र NEET समुपदेशन वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

इतर बातम्या:

ज्या रझा अकादमीवर बंदीची मागणी केली जातेय, त्यांच्या दंगलीमुळे महाराष्ट्राच्या डॅशिंग IPS अधिकाऱ्याचं करिअर उतारणीला लागलं माहिती आहे? वाचा सविस्तर

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी

maharashtra cet cell launch Neet ug counselling 2021 website check details for required documents list for

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....