FYJC Admission : अकरावी प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रासंदर्भात वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरु होतं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे.

FYJC Admission : अकरावी प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रासंदर्भात वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:02 AM

मुंबई: अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरु होतं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

30 दिवसात जात प्रमाणपत्र सादर करावं लागणार

अकरावीसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच किंवा ती उपलब्ध नसल्यास वडिलांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. प्रवेश निश्चित करणारे विद्यार्थ्यांना 30 दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करतील त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक नाही.

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून

अकरावी प्रवेशासाठी FYJC (11th) पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी 27 ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरु होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?

स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल

स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा

स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल

इतरा बातम्या:

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार?

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर

Maharashtra FYJC Admission 2021 Varsha Gaikwad said reserved category students can submit caste certificate during thirty days from admission

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.