MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर
निरजंन तोरडमल स्वराज चव्हाण
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 10:06 PM

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभाग आणि इतर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. शहरी विभागातून स्वराज चव्हाण आणि इतर बोर्ड विभागातून निरंजन तोरडमल हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे.

साताऱ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत झेंडा

शहरी विभागातून सी एस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वडूज या शाळेचा स्वराज महादेव चव्हाण हा विद्यार्थी 98.67 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. या शाळेचे तर, इतर बोर्ड विभागूतन सताऱ्यातील पोदार स्कूल मधील निरंजन तोरडमल हा पहिला आला आहे. सातारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पाचवीतील निरंजन राजेंद्र तोरडमल हा युवक महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे त्याला 92.66 इतके मार्क मिळाले आहेत.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी

शहरी विभाग आणि इतर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. शहरी विभागातून स्वराज चव्हाण आणि इतर बोर्ड विभागातून निरंजन तोरडमल हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. तर,ग्रामीण विभागातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तळेगाव दभ. क्रमांक 2 ची विद्यार्थिनी तनिष्का जयकुमार गायकवाड राज्यात पहिली आली आहे.

इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीची विद्यार्थिनी श्रावणी संतोष धस 96.66 गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे. तर, या शाळेचे अदविका महेश जाधव, संस्कृती शशिकांत देशमुख, प्रणव अमोल ढगे, पार्थ उमेश पाटील,प्रांजली निकम, आर्यन सुतार, तनिष्का जाधव आणि तुप्ती सुशांत जाधव या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं आहे. शाळेच्या एकूण 56 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. इतर बोर्डाच्या म्हणजेच आयसीएसई आणि सीबीएसईच्या गुणवत्ता यादीत विद्यानिकेतन अकॅडमी अहमदनगरची विद्यार्थिनी प्राजक्ता दिपक चव्हाण 89.83 टक्के गुण मिळवत राज्यात पहिली आली आहे. तर,ग्रामीण विभागातून अहमदनगर जिल्ह्यातील नुतन एमवी मिरजगाव येथील उमर कालीम शेख 94.00 टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे.

निरजंन तोरडमलचा शिक्षकांकडून सत्कार

सातारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पाचवीतील निरंजन राजेंद्र तोरडमल हा विद्यार्थी आयसीएसई आणि सीबीएसई विभागातून महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे. त्याला 92.66 इतके मार्क मिळाले आहेत. या निकालानंतर शाळेतील शिक्षकानी त्याच्या घरी जाऊन निरांजनचा सत्कार केला आहे.

इतर बातम्या:

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Devendra Fadnavis | अतिरेकी संघटनांकडून संघ मुख्यालयाची रेकी करणे ही गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस

Maharashtra scholarship result 2021 Toppers list Satara Two Students and Ahmednagar two students Pune and Beed one students achieved first place in state

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.