Maharashtra School College Reopen : आजपासून कॉलेज सुरु होणार, पुणे नागपूरसह ठिकठिकाणी शाळा पुन्हा गजबजणार
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी जाहीर केल्याप्रमाणं आज राज्यातील महाविद्यालय (College Reopen) आणि विद्यापीठं पुन्हा सुरु होणार आहेत.
मुंबई: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी जाहीर केल्याप्रमाणं आज राज्यातील महाविद्यालय (College Reopen) आणि विद्यापीठं पुन्हा सुरु होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (School Reopen) महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज राज्यातील महाविद्यालय पुन्हा सुरु होतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाविद्यालय आणि विद्यापीठात प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे, नागपूर, गोंदिया, औऱंगाबाद सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातही आज शाळा सुरु होणार आहेत. पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचा निर्णय अजित पवार यांच्या उपस्थित घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आणि पालकांच्या संमतीनं शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
महाविद्यालय आजपासून सुरु, प्रात्याक्षिक परीक्षा ऑफलाईन
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण देणारी महाविद्यालय आणि विद्यापीठं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत आजपासून सुरु होत आहेत. राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संबंधित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने यामधील नियमित वर्ग आज 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी चर्चा करून विद्यापीठ-महाविद्यालये सुरु करण्यात येतील. कोविड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, तर इतरांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रात्याक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालय आजपासून सुरु होणार आहे. पुणे,अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू होणार आहे. आजपासून विद्यापीठात कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार आहे. यासंदर्भात फर्ग्युसन महाविद्यालयानं परिपत्रक काढलं आहे. महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीत सुरु होणार आहेत.
नागपूरमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा
नागपूर शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत. नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शाळा सुरु करण्याला मान्यता दिली आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार आहे. शाळा प्रशासनाला स्वच्छता आणि सुरक्षिततेविषयी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांना 48 तासांपूर्वीचे RTPCR प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोज घेतलेले असावे, असे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरमध्ये दोन वर्षानंतर पहिल्यांदा पहिली ते चौथीचे विद्यार्थी वर्गात येणार आहेत. तर,गोंदिया जिल्ह्यातही आजपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत.
पुण्यात आजपासून शाळा सुरु
पुण्यात आजपासून पहिली ते आठवीचे वर्ग चार तासांसाठी सुरु होतील. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहतील. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांची संमती सादर करावी लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठण्यासंदर्भातली संमत्रीपत्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड मध्ये आज पासून सुरू होणार आहे,
वसई विरारमध्ये आजपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु
वसई विरार महापालिका हद्दीतील 5 ते 7 वी पर्यंतच्या सर्व शाळा आजपासून सुरु होत आहेत. पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा मात्र 7 फेबुरवारी पासून सुरु होणार आहेत. 8 वी ते 12 वी च्या शाळा, कॉलेज मात्र या पूर्वीच सुरु झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्या नंतर, शासनाने दिलेले नियम योग्य रीतीने शाळा व्यवस्थापन पाळतय का? यात आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक तपासण्यासाठी महापालिकेचे नेमलेले पथक फिरणार आहे. नेमलेल्या पथकात प्रभागनिहाय नोडेल ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत. सोलापूर महापालिका क्षेत्रात देखील शाळा सुरु होणार आहेत. नांदेडमध्येही शाळा सुरु होणार आहेत.
इतर बातम्या:
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाची स्थापना का झाली? जाणून घ्या इतिहास
Maharashtra School College Reopen from today Pune Nagpur Aurangabad Solapur Schools start from today