School Start : 13 जूनपासून शाळा सुरु! शाळांसाठी विशेष नियमावली, काय असतील नियम?
Maharashtra School News : शाळेतील विद्यार्थी, शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली जाणार का, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
मुंबई : कोरोना (Mumbai Corona Update) रुग्णवाढीची चिंता सतावू लागली आहे. त्या पार्श्वभूमी शाळा (School Start Date) नेमक्या कधी सुरु होणार? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, शाळा 13 जूनपासूनच सुरु होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिक्षमंत्र्यांनी ही माहिती दिली. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसात मुंबईत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन पुन्हा केलंय. सध्यातरी मास्क सक्ती करण्यात आलेली नसली, तर सगळ्यांनी खबरदारी बाळगावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, शाळा 13 जूनपासून सुरु होणार असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. तसे निर्देश शिक्षण खात्याकडून लवकरच शाळांना देण्यात येणार आहेत. दोन वर्षांनंतर शाळा पुन्हा जोमात सुरु होणार होत्या. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे पालकांना चिंता सतावू लागली आहे. अशातच शाळा पूर्ण क्षमतेनंच निर्धारीत वेळेतच सुरु होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ : ‘सध्यातरी शाळा बंद होणार नाही’
शाळेत मास्कसक्ती होणार?
शाळेतील विद्यार्थी, शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली जाणार का, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहनही करण्यात आलंय. शाळा सुरक्षितपणे करण्याच्या अनुशंगाने सर्व खबरदारी घेत काळजी बाळगली जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.
लवकरच नवी नियमावली..
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. सर्वच शाळांना ही नियमावली बंधनकारक असमार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्धभू नये, यासाठी ही नवी नियमावली जारी केली जाणार आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 961 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 बरे झालेत. मुंबई रविवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जवळपास हजार रुग्णांची भर पडल्यानं आता पुन्हा एकदा मुंबईतील पालिका प्रशासन सतर्क झालंय. मुंबईसोबत ठाणे, नवी मुंबई, वसई विरार या आजूबाजूच्या क्षेत्रातही रुग्णवाढीची भीती असल्याचं खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातंय.