Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!
Maharashtra SSC Result 2021 Toppers : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
पुणे : दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागलेला आहे तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत.
पोरांनी तर रेकॉर्ड मोडला!
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
राज्याचा निकाल 99.95 टक्के
दहावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 75 हजार 806 विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 74 हजार 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल हा 99.95 टक्के लागला असून गेल्या वर्षीपेक्षा 4 टक्के वाढ निकालात झाली आहे.
कोकण विभागाची बाजी, तर नागपूर तळाशी
राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे.
निकालासंबंधीचे ठळक मुद्दे
- एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
- राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
- श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार
- मुलांचा निकाल 99.94 टक्के,
- मुलींचा निकाल 99.96 टक्के
- 12 384 शाळांचा निकाल 100%
- 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
- तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
Maharashtra SSC Result 2021 Today Date and Time Marathi Check result mh ssc ac in Class X 10th results official website online at mahahsscboard in
दहावीच्या निकालासंबंधीचे प्रत्येक अपडेट नक्की वाचा :
Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99. 95 टक्के