Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला आहे. यंद्च्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे.

Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?
१०वीचा निकाल
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:11 PM

Maharashtra Board SSC (10th) Result 2021 Date and Time : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला आहे. यंद्च्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल राखी, नेमकं कारण काय?

4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यात सर्वाधिक विद्यार्थी रिपीटर्स आहेत, ज्यांचे मागील 3,4 वर्षांच्या गुणपत्रिका तपासणे आवश्यक आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यांच्या आधीच्या निकालाच्या प्रती पडताळण्याचे काम सुरु असून, यानंतर या विद्यार्थांचे निकाल जाहीर होतील.

1 वाजता पाहता येणार निकाल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे.  इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली होती. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

निकाल कुठे पाहणार?

सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

वेबसाईट 

  1.  http://result.mh-ssc.ac.in/ 
  2. https://mahahsscboard.in/ 

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021)

?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

(Maharashtra SSC Result 2021 total 4922 Student results reserved know the exact reason)

हेही वाचा :

JEE Mains 2021 Registration : जेईई मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची तारीख वाढवली, परीक्षेच्या तारखेतही बदल

ITI Admission 2021 | आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु, 966 आयटीआयमध्ये 1 लाख 36 हजार जागा, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.