वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ, धुळ्यात खासदारांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना प्रवेश

कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे.

वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ, धुळ्यात खासदारांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना प्रवेश
कोल्हापूरमध्ये टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 11:49 AM

मुंबई: कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे. दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा रखडल्या होत्या त्या आज कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली आहे.   मात्र, एसटीच्या संपाच्या वेळी महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मत परीक्षार्थींनी मांडलं. नेहरु हायस्कूल केंद्रावर हा प्रकार घडला. तर, दुसरीकडे धुळे जिल्ह्यात खासदार सुभाष भांबरे यांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना 20 मिनिटांनंतरही प्रवेश मिळाला.

खासदार सुभाष भामरे यांच्या प्रयत्नामुळे परीक्षार्थींना प्रवेश

शिक्षक पात्रता परीक्षा आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने धुळ्यातही बऱ्याच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. त्यात वेळेआधी पोहोचूनही काही परीक्षार्थींना परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आतमध्ये घेण्यास नकार दिल्याने परीक्षार्थींनी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्याकडे धाव घेतली. खासदार भामरे यांनी परीक्षार्थींची समस्या लक्षात घेत परीक्षार्थी सोबत परीक्षा केंद्र गाठले. परीक्षार्थींना परीक्षा केंद्र प्रवेश मिळावा यासाठी खासदार भांबरे यांनी प्रयत्न केले. वीस मिनिटानंतर चा अथक प्रयत्नानंतर खासदार भामरे यांच्यामुळे परीक्षार्थींना आत प्रवेश मिळाला. त्यामुळे परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले तसेच भामरे यांचेही आभार मानले.

नाशिकमध्येही विद्यार्थ्यांना फटका

एस.टी बंद असल्याचा फटका टीईटी परीक्षार्थीना बसला आहे.नाशिकमध्ये यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून दूर राहिले आहेत.10 ते 15 मिनिट विद्यार्थ्यांना उशीर झाल्यामुळे परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना आता प्रवेश दिला नाहीये..नाशिकच्या बॉईज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांचा गोंधळ बघायला मिळाला..नाशिक जिल्ह्यात 43 केंद्रांवर जवळपास 28 हजार विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

एसटी संपामुळं विद्यार्थ्यांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज TET देणाऱ्या उमेदवांराचे हाल झाले आहेत. एसटी सेवा ठप्प असल्याने या परीक्षार्थींना जादा पैसे देऊन परीक्षा केंद्रावर प्रवास करावा लागलाय. तर TET आणि नेट ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी नाराजी व्यक्त केलीय. नांदेड जिल्ह्यात जवळपास 25 विद्यार्थी 84 केंद्रावर ही परीक्षा देतायत.

जळगावात चिमुकल्यांसह परीक्षा केंद्राच्या आवारात मुक्काम

जळगाव जिल्ह्यात रविवारी टीईटीसाठी आलेल्या परीक्षार्थी उमेदवारांचे बसेस बंद असल्याने प्रचंड हाल झाले. काही उमेदवारांना तर वेळेवर परीक्षा देता यावी म्हणून चिमुकल्यांसह परीक्षा केंद्र आवारातच झोका बांधून रात्रीचा मुक्काम करावा लागला. जिल्ह्यात रविवारी 22 केंद्रांवर 13 हजार 224 उमेदवार परिक्षा देत आहेत. यात सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान पेपर 1 होणार आहे. त्यासाठी 7176 उमेदवार प्रविष्ट आहेत. तर पेपर 2 हा दुपारी 2 ते 4.30 वाजेदरम्यान होणार आहे.यासाठी ६ हजार ४८ उमेदवार प्रविष्ट आहेत. एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने एसटी सेवा ठप्प झाली. बस बंद असल्याने जळगाव जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी बाहेरील विविध जिल्ह्यांमधून येणार्‍या पुरुष तसेच महिला उमेदवारांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.

इतर बातम्या:

VIDEO: एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर फंडातून भरपाई द्या; संजय राऊतांची मागणी

Maharashtra TET Exam some students claim exam center in Kolhapur dont gave entry for exam

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.