MHT CET Admit Card: MHT-CET PCM चं ॲडमिट कार्ड आज जारी होणार! समजा ॲडमिट कार्डात चुका झाल्या तर…? वाचा

ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे.

MHT CET Admit Card: MHT-CET PCM चं ॲडमिट कार्ड आज जारी होणार! समजा ॲडमिट कार्डात चुका झाल्या तर...? वाचा
MHT CET 2022 Admit CardImage Credit source: Official Website
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:11 PM

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र एमएचटी सीईटी 2022 चे प्रवेशपत्र (MHT CET Admit Card 2022) आज, 26 जुलै रोजी जारी करणार आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पीसीएम चे (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) हॉलतिकीट दुपारी २ वाजेपर्यंत मिळू शकतं, याची नोंद घ्यावी. एकदा प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर, उमेदवार ते mhtcet2022.mahacet.org आणि cetcell.mahacet.org परीक्षा पोर्टलवरून डाउनलोड करू शकतात. सीईटी सेलने (CET Cell) ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. पीसीबीसाठी (Physics,Chemistry,Biology PCB Admit Card 2022) प्रवेशपत्रे 8 ऑगस्ट रोजी दिली जातील.

एमएचटी सीईटी 2022 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ते येथे आहे:

  1. स्टेप 1: mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell.mahacet.org वेबसाईट्स वर जा.
  2. स्टेप २ : होमपेजवर उपलब्ध असलेल्या एमएचटी सीईटी पीसीएम प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
  3. स्टेप 3: त्यानंतर उमेदवारांना आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड पोर्टलवर योग्य प्रकारे टाकावा लागेल.
  4. स्टेप 4 : काही मिनिटांतच तुमच्या स्क्रीनवर एमएचटी सीईटी 2022 ॲडमिट कार्ड दिसेल.
  5. स्टेप 5 : सर्व तपशीलांचा आढावा घेऊन एमएचटी सीईटी 2022 हॉलतिकीटची प्रिंटआऊट ठेवा.

प्रवेशपत्रावर काही तफावत किंवा त्रुटी असल्यास…

विद्यार्थ्यांनी त्यांच्या एमएचटी सीईटी 2022 प्रवेश कार्डवरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. तुमच्या एमएचटी सीईटी प्रवेशपत्रावर काही तफावत किंवा त्रुटी असल्यास उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा. यानंतर, सीईटी सेल संबंधित उमेदवारांना त्यांच्या एमएचटी सीईटी हॉल तिकिटात समस्या असल्यास भरण्यासाठी एक हमीपत्र सादर करेल.

MHT CET

इंजिनीअरिंग (Engineering), फार्मसी आणि इतर संलग्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी घेतली जाते. या सेलमध्ये आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, हॉस्पिटॅलिटी, लॉ आणि मॅनेजमेंटसह इतर अनेक अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटी सेल महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागांसाठी एनईईटी समुपदेशन देखील आयोजित करते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.