MHT CET Result 2023: CET चा निकाल! इथे चेक करा
यावर्षी PCM ग्रुपसाठी एमएचटी सीईटी 2022 परीक्षा 9 मे ते 14 मे दरम्यान आणि PCB ग्रुपची परीक्षा 15 मे ते 20 मे दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
मुंबई: प्रवेश परीक्षा MHT CET 2023 चा निकाल जाहीर होणार आहे. निकाल आज म्हणजेच 2023 जून 12 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) गटांच्या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर उपलब्ध असतील.
यावर्षी PCM ग्रुपसाठी एमएचटी सीईटी 2022 परीक्षा 9 मे ते 14 मे दरम्यान आणि PCB ग्रुपची परीक्षा 15 मे ते 20 मे दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
MHT CET निकाल कसा तपासावा?
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेला यंदा 4.6 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट 2023 चा निकाल 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाइट – cetcell.mahacet.org वर जावे लागेल.
एमएचटी सीईटी निकाल कसा तपासावा?
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cetcell.mahacet.org अधिकृत संकेतस्थळावर जा.
- संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील पोर्टल लिंकवर क्लिक करा.
- यानंतर चेक एमएचटी सीईटी निकाल 2023 च्या लिंकवर जा.
- पुढच्या पानावर रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा.
- निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.
समुपदेशन कधी होणार?
MHT CET 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन एमएचटी सीईटी समुपदेशन 2023 आयोजित केली जाईल. एमएचटी सीईटी 2023 च्या निकालाच्या आधारे प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी व्हावे लागेल.
राज्यभरातील सहभागी संस्थांमार्फत इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे एमएचटी सीईटी घेतली जाते. दरम्यान, जेईई मेन सेशन 2 चा निकाल आला असून रविवारी नीट यूजी होणार आहे.