MPSC : निस्ता गोंधळ ! निकालही येईना,परीक्षाही होईना, विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा
पण प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे प्रकरण न्यायालयात गेलं, प्रकरणाचा न्यायालयाचा निकाल आणि मुख्य परीक्षा दोन्हींना विलंब झाला. या सगळ्या समस्यांवर एमपीएससी आयोग कुठलाही तोडगा काढत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
मुंबई : 4 सप्टेंबर 2021 ला एमपीएससी गट ब ची पूर्व परीक्षा (Preliminary Exam) झाली होती ज्या परीक्षेत काही प्रश्न चुकले होते. याचीच मुख्य परीक्षा (Mains Exam) 29 जानेवारीला होणार होती मात्र परीक्षेत काही प्रश्न चुकले म्हणून विद्यार्थी न्यायालयात गेले या विषयाचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेस विलंब होतोय. एमपीएससीनं ‘एमपीएससी गट ब’ संदर्भातली जाहिरात (MPSC Advertisement) 2022 मध्ये जाहीर केली होती. पण प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे प्रकरण न्यायालयात गेलं, प्रकरणाचा न्यायालयाचा निकाल आणि मुख्य परीक्षा दोन्हींना विलंब झाला. या सगळ्या समस्यांवर एमपीएससी आयोग कुठलाही तोडगा काढत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन करणार आहेत.
संध्याकाळी 5 वाजता अलका चौकात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. दरम्यान एक वर्षभरापासून ही मुख्य परीक्षा रखडलेली आहे. एमपीएससी गट ब ची मुख्य परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मुलाखतीनंतर अवघ्या काही तासातच हा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत पुणेकर प्रमोद चौगुलेने बाजी मारली आहे. प्रमोदने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नितेश कदमने दुसरा आणि रूपाली मानेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.