Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC : दहावीचं वर्ष संपताना टॅब खरेदीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेचा 39 कोटींचा खर्च नेमका कुणाच्या फायद्याचा?

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पालिका टॅब खरेदी करणार आहे.

BMC : दहावीचं वर्ष संपताना टॅब खरेदीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेचा 39 कोटींचा खर्च नेमका कुणाच्या फायद्याचा?
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 2:05 PM

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पालिका टॅब खरेदी करणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये या संदर्भातील प्रस्ताव मांडला जाणार आहे. मुंबई महापालिका येत्या काळात 19 हजार 400 टॅब खरेदी करणार असल्याची माहिती आहे. पालिका यासाठी 39 कोटी रुपये खर्च करणार आहे. 2021-22 हे शैक्षणिक वर्ष संपत आलंय. दहावीच्या परीक्षांना आता केवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उरलाय त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आता टॅब खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडणार आता मंजुरी मिळाल्यानंतर टॅब मिळण्यास 60 दिवस ते 75 दिवस लागणार असल्यानं दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबचा लाभ मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका टॅबसाठी 20 हजार खर्च

मुंबई महापालिका विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचं ओझं कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पालिका दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच तब्बल 19 हजार 400 टॅब खरेदी करणार आहे. एका टॅबसाठी 20 हजार 532 रुपयांचा खर्च येणार आहे. स्थायी समितीनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास मुंबई महापालिका 39 कोटी रुपये खर्च करणार आहे.

टॅबमध्ये चार भाषांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्येही विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी पालिकेने 2021-22 या वर्षात दहावीच्या सर्व चार माध्यमातील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आता टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. या टॅबमध्ये मराठीसह उर्दू, हिंदी, इंग्रजी या चार भाषांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.

बालभारतीकडून परवानगी घेणार

मुंबई महापालिका टॅब खरेदी करताना बालभारतीकडून परवानगी घेणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनाप्रशिक्षण देण्याची जबाबदारीही टॅब देणाऱ्यांवर देण्यात येणार आहे.

टॅब पुरवठ्यासाठी निविदेला मुदतवाढ

मुंबई महापालिकेने टॅबच्या खरेदीसाठी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्या निविदांना चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर हा प्रस्ताव आता स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. एड्युसपार्क इंटरनॅशनल प्रा.लि. ही कंपनीची निवड मुंबई महापालिकेच्या वतीनं टॅब पुरवण्यासाठी करण्यात आलीय.

इतर बातम्या:

PDCC Bank Election: एका जागेचं वाईट वाटतंय, पुणे जिल्हा बँकेच्या विजयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

KDMC Election | केडीएमसी प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करणार, यावेळी 11 प्रभागांची भर

Mumbai Municipal Corporation decided to buy tab for class 10 student proposal will put for approval of standing committee

शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.