मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनात झेप, महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन, सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांची माहिती

वुडसच्या शिक्षणविषयक खलित्यानंतर भारतात तीन विद्यापीठं स्थापन करण्यात आली त्यापैकी एक विद्यापीठ मुंबई विद्यापीठ होते. 1996 मध्ये विद्यापीठाचं नाव बदलून मुंबई विद्यापीठ असं करण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनात झेप, महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन, सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांची माहिती
mumbai university
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 2:09 PM

मुंबई: महाराष्ट्रातील सर्वात जुनं विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाला बंगळुरु येथील नॅक मूल्यांकन समितीनं नुकतीच भेट दिली होती. नॅक मूल्यांकन समितीनं मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांना 24, 25 आणि 26 ऑगस्टला भेट दिली होती. या भेटीत विद्यापीठाच्यावतीनं शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम, विद्यापीठाची कामगिरी आणि इतर गोष्टींची पाहणी करण्यात आली. नॅक मूल्यांकन समितीनं पाहणी केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाला नॅककडून मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाला A++ असं मानांकन मिळाल्याची माहिती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी माध्यमांना दिली आहे. सावंत यांनी या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचं कौतुक केलं आहे.

प्रदीप सावंत नेमकं काय म्हणाले ?

प्रदीप सावंत मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य यांनी मुंबई विद्यापीठाला नॅक मूल्यांकनात ए डबल प्लस अशी श्रेणी मिळालेली आहे. ३.६५ इतका सीजीपीए विद्यापीठाला मिळालेले आहेत. मुंबई विद्यापीठाला महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत, अशी माहिती प्रदीप सावंत यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठानं मिळवलेल्या या यशाबद्दल कुलगुरु, प्र कुलगुरु, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचं अभिनंदन करतो, असं प्रदीप सावंत यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळं  मूल्यांकन लांबलं

बंगळूरु येथील नॅशलन अ‌ॅक्रिडेशन अँड असेसमेंट बोर्ड म्हणजेच नॅक या संस्थेकडून शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन केलं जातं. दर चार वर्षांनी शिक्षण संस्थेच्या कामाचं मूल्यांकन करुन संबंधित संस्थेला मानांकन दिलं जातं. मुंबई विद्यापीठांचं मूल्यांकन चार वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. 24 ते 26 जुलै दररम्यान नॅक समितीनं मुंबई विद्यापीठाला भेट देत शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली होती. नॅक समिती अध्यापन, अध्ययन, विद्यापीठाकडील पायाभूत सोयी आणि सुविधा, प्रशासन, अभ्यासक्रम या मुद्यावर विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली जाते. विद्यापीठानं 2020 मध्ये तब्बल तीन वर्षे उशिरानं सेल्फ स्टडी रिपोर्ट नॅक संस्थेला सादर केला होता. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाची पहिली आणि दुसरी लाट आणि लॉकडाऊन यामुळे नॅक समितीची भेट लांबली होती. गेल्या मूल्यांकनामध्ये विद्यापीठाला ए ग्रेड मिळाली होती. 2012 मध्ये यापूर्वीचं मूल्यांकन झालं होतं.

मुंबई विद्यापीठाची स्थापना

मुंबई विद्यापीठाला पूर्वी यूनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे या नावानं ओळखलं जायचं. मुंबई विद्यापीठ आधुनिक भारतातील पहिल्या काही विद्यापीठांपैकी एक आहे. वुडसच्या शिक्षणविषयक खलित्यानंतर भारतात तीन विद्यापीठं स्थापन करण्यात आली त्यापैकी एक विद्यापीठ मुंबई विद्यापीठ होते. 1996 मध्ये विद्यापीठाचं नाव बदलून मुंबई विद्यापीठ असं करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्ट कुठे पाहायची?

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

Mumbai University accredited by NAAC A plus plus ranking said by Pradip Sawant Senate Member of University

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.