मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलची MMS आणि MCA अभ्यासक्रमाची 5 डिसेंबरला प्रवेश परीक्षा, नोंदणीसाठी उरले काही तास

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल केंद्राकडे एमएएस आणि एमसीएच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठ प्रशासनानं अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत अर्ज करण्यास 29 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलची MMS आणि MCA अभ्यासक्रमाची 5 डिसेंबरला प्रवेश परीक्षा, नोंदणीसाठी उरले काही तास
मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरूचे वीजबिलं अव्वाच्या सव्वा
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:23 PM

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या ऑयडॉल केंद्रानं एमएमएस अभ्यासक्रम आणि एमसीएच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत 29 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तर, प्रवेश परीक्षेचं आयोजन 5 डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयडॉलच्यावतीनं विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी आयडॉलकडे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती तसेच परीक्षेची तारिख देखील बदलण्याची मागणी केली होती. आता 3 डिसेंबर ऐवजी 5 डिसेंबर रोजी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल केंद्राकडे एमएएस आणि एमसीएच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठ प्रशासनानं अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत अर्ज करण्यास 29 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन आयडॉलच्या वतीनं करण्यात आलं आहे.

प्रवेश परीक्षा 5 डिसेंबरला

आयडॉलच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आता एमएमएस आणि एमसीएची प्रवेश परीक्षा 5 डिसेंबरला होणार आहे. यापूर्वी परीक्षेची तारीख 3 डिसेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर आयडॉलनं परीक्षा रविवारी म्हणजेच 5 डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयडॉल हे मुंबई विद्यापीठाचं दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले केंद्र आहे. आयडॉलमध्ये नियमित शिक्षण घेऊ न शकणारे विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. नोकरी करत करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयडॉलचे अभ्यासक्रम महत्वाचे ठरत आहेत.

अर्ज कुठे दाखल करायचा?

मुंबई विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी https//old.mu.ac.in/distance-open-learning या वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करावेत. एमएमएस साठी 720 तर एमसीएसाठी 2000 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या :

ओमिक्रॉनची भीती, 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? सरकार काय निर्णय घेणार?

Mahatma Phule : महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक समाजाद्वारे सत्याचा मार्ग दाखवला,आजही त्यांचं कार्य प्रेरणादायी

Mumbai University IDOL MMS MCA registration for entrance exam extended to 29 November and exam will conduct on 5 December

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.