Mumbai University: मुंबई विद्यापीठाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्ट कुठे पाहायची?
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांसाठीची प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठात अनुदानित असो की विना अनुदानित, विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांसाठीची प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठात अनुदानित असो की विना अनुदानित, विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 14 ऑगस्टपर्यंत सुरु होती. पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता 25 ऑगस्ट तर तिसरी 30 ऑगस्टला जाहीर केली जाईल.
गुणवत्ता यादी कुठे पाहायची?
मुंबई विद्यापीठाकडून आज पदवी प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केली गेली आहे. mu.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या महाविद्यालयाची गुणवत्ता यादी पाहू शकतात.
गुणवत्ता यादी कशी पाहायची?
स्टेप 1: गुणवत्ता यादी पाहण्यासाठी, सर्वप्रथम mu.ac.in वर MU च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या मुंबई विद्यापीठ प्रवेश 2021 लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: लॉगिन डिटेल्सद्वारे सबमिटवर क्लिक करा. स्टेप 4: सबमिट केल्यानंतर तुमची पहिली गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसेल.
विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार ?
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना नावनोंदणी mu.ac.in या वेबसाईटवर करावी लागते. विद्यार्थ्यांना सेल्फ अफेडेविट भरून कोणत्याही एका कॉलजमध्ये प्रवेश निश्चित करणं गरजेचं असतं. एकदा तो निश्चित झाला तर नंतर मुळ कागदपत्रं सादर करुन अंतिम प्रवेश दिला जातो.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज विक्री- 5 ते 14 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंत
ऑनलाईन फॉर्म दाखल करण्याची तारीख
6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट इन हाऊस प्रवेश तसच अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशही याच कालावधीत केले जातील.
पहिली गुणवत्ता यादी
17 ऑगस्ट (स.11 वाजता)
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी
18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, दुपारी 3 वा. पर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी
25 ऑगस्ट, सायं. 7 वा.
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी आणि फी भरणे
1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर
विल्सन महाविद्यालयाची मेरिट लिस्ट
मुंबईतील विल्सन कॉलेजने बीए, बीएससीसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्याबरोबरच कट ऑफ गुणांची पहिली यादी जाहीर केली आहे. आणि बी.कॉम. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि बीए प्रोग्रामसाठी इतर श्रेणींसाठी फेरी 1 साठी विल्सन कॉलेज कटऑफ पाहा.
- खुला – 94
- अनुसूचित जाती – 83.33
- अनुसूचित जमाती – 76.8
- वी.जे./ डी.टी (एक) – 78.62
- एन.टी.(ब) – 66.5ॉ
- एन.टी (ड) – 79.17
- ओबीसी – 85.33
- ईबीसी / ईडब्ल्यूएस – 76
- एसबीसी – 60
- अपंग – 66.17
- सांस्कृतिक / खेळ / माजी सेवक/सरकारी बदली इ. 84.2
नामवंत महाविद्यालयं
मुंबई विद्यापीठातील लोकप्रिय महाविद्यालयांमध्ये सामाजिक कार्य महाविद्यालय निर्मला निकेतन, एसआयईएस महाविद्यालय, घनश्याम दास सराफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, विल्सन महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, सोफिया महाविद्यालय, आरडी राष्ट्रीय महाविद्यालय, नरसी मोनजी महाविद्यालय, सेंट. झेवियर्स कॉलेज, जय हिंद कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश घेतले जाणार आहेत. महाविद्यालयांनी गुणवत्ता यादी जाहीर केलीय.
संबंधित बातम्या :
पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंनी घेतली फिरकी
Mumbai University released first merit list for UG courses at mu ac in