आयटीआय विद्यार्थ्यांना 28 हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देणार, नवाब मलिक यांची घोषणा
नवाब मलिक यांनी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना प्रतिपूर्ती देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Nawab Malik ITI Students)
मुंबई: कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 हजार 800 रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे. नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या आणि खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेला लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. (Nawab Malik said Maharashtra Government will gave reimbursement to ITI students)
शासकीय आयटीआयमधील पीपीपी योजनेंतर्गत तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांना २८ हजार ८०० पर्यंत शुल्क प्रतिपूर्ती. विद्यार्थ्यांनी https://t.co/6AtiV3XVqA वर अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांचे आवाहन. pic.twitter.com/0Z6haosIiF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2021
विद्यार्थ्याना 28 हजार रुपयांपर्यंत प्रतिपूर्ती
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. आयटीआयचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन्ही योजनेतून 28 हजार 800 रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येणार आहे. आयटीआयमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असं नवाब मलिक यांनी केले आहे.
लाभ कुणाला मिळणार?
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिपूर्तीचा लाभ 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 100 टक्के दिला जातो. तर, अडीच लाख ते 8 लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 80 टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कमेची विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार 19 हजार 200 ते 28 हजार 800 रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत दिली जाते, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
अर्ज कुठे करायचा?
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेतून लाभ घेण्यासाठी 10 मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केलेयं. प्रतिपूर्ती योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.
संबंधित बातम्या:
MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम
ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार
(Nawab Malik said Maharashtra Government will gave reimbursement to ITI students)