NEET PG 2022 : घ्या ! इंटर्नशिप पूर्ण नाही, तयारीसाठी वेळ नाही, एकूणच सगळी बोंब ! परीक्षा मात्र ठरलेल्या वेळेत

IMA ने आपल्या पत्रामध्ये नीट पीजीची परीक्षेचं आयोजन 21 मे ऐवजी नंतर केलं जावं अशी मागणी केली होती. परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे.

NEET PG 2022 : घ्या ! इंटर्नशिप पूर्ण नाही, तयारीसाठी वेळ नाही, एकूणच सगळी बोंब ! परीक्षा मात्र ठरलेल्या वेळेत
असा करा UGC NET 2022 साठी अर्जImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 1:14 PM

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात नीट पीजी (NEET PG) परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि या परीक्षेला बसणाऱ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. दरम्यान पदव्युत्तर (NEET-PG 2022) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीये. ही परीक्षा (Exam) पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा सरकारला पत्र लिहीत केली होती. IMA ने आपल्या पत्रामध्ये नीट पीजीची परीक्षेचं आयोजन 21 मे ऐवजी नंतर केलं जावं अशी मागणी केली होती.परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे.

2021 च्या नीट पीजी राऊंडमध्ये ज्यांना अपयश येईल, त्यांनाही 2022च्या परीक्षेला पुन्हा बसता येण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, अशी मागणी केली होती. तसंच सध्याच्या घडीला नीट पीजी 2022 परीक्षेसाठी पुरेसा वेळही विद्यार्थ्यांना (Medical Students) मिळू शकलेला नाही, असंही आयएमएने म्हटलं होतं. परीक्षा पुढे का ढकलावी याचं कारण आयएमए नं पत्रात लिहिलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहीत आयएमएने ही मागणी केली होती .

हे सुद्धा वाचा

…म्हणून आयएमएकडूनही मागणी

खरंतर कोरोना काळात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कोविड ड्यूटी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची इंटर्नशिप वेळत पूर्ण होऊ शकली नाही. हे सर्व विद्यार्थी पात्र असूनही वेळेत इंटर्नशिप पूर्ण न केल्यानं त्यांना परीक्षा देता न येणं दुर्भाग्यपूर्ण असल्याचं आयएमएनं आपल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. 21 मे रोजी घेण्यात येणारी ही परीक्षा पुढे ढकलली गेली, तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. एकतर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थ्यांची इंटर्नशिपही पूर्ण होईल, असा विश्वास आयएमएनं व्यक्त केला होता. या सगळ्यानंतर सुद्धा परीक्षा मात्र ठरलेल्या तारखेला, 21 मे लाच होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....