NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (NBE) नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2021) परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. नीट पीजी 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट nbe.edu.in वरुन डाऊनलोड करता येईल.

NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
नीट
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:16 AM

NEET PG Admit Card नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (NBE) नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2021) परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. नीट पीजी 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट nbe.edu.in वरुन डाऊनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. NEET PG 2021 परीक्षा 11 सप्टेंबर 2021 ला आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दुपारी 1 ते सांयकाळी 5:30 वाजेदरम्यान आयोजित केली जाईल . ही परीक्षा कॉम्प्यटर बेस्ड पद्धतीनं होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 परीक्षा केंद्रांविषयी माहिती अ‌ॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे या विषयी माहिती मिळवावी.

NEET PG 2021 Admit Card डाऊनलोड कसे करायचे?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी एनबीईची ऑफिशियल वेबसाईट nbe.ed.u.in वर भेट द्यावी. स्टेप 2: वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” लिंक वर क्लिक करा. स्टेप 3: युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. स्टेप 4: तुम्हाला तुमचे अ‌ॅडमिट कार्ड उपलब्ध होईल. स्टेप 5: अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा.

NEET PG परीक्षा का घेतली जाते?

NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

NEET UG परीक्षा 12 सप्टेंबरला

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. नीट परीक्षेसाठी 6 दिवस बाकी राहिले आहेत. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना एक स्वयंघोषणापत्र उपलब्ध होार आहे. त्या स्वयंघोषणापत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी अलीकडील काळात केलेल्या प्रवासाची माहिती भरावी लागणार आहे. कोरोनाचा प्रास रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा चार लाखांखाली, मात्र कोरोनाबळींत वाढ

नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला; विष्णूपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडले!

NEET PG Admit Card 2021 released at nbe edu in check here how to download

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.