NEET PG Counselling: नीट पीजी EWS आरक्षण, केंद्र सरकार 8 लाखांवर ठाम, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, समुपदेशन कधी सुरु होणार?

ईडब्ल्यूएस कोट्यातील आरक्षणाबाबत उत्पन्न मर्यादा निश्चित करताना केंद्राच्यावतीनं या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.

NEET PG Counselling: नीट पीजी EWS आरक्षण, केंद्र सरकार 8 लाखांवर ठाम, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, समुपदेशन कधी सुरु होणार?
Neet
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:59 PM

NEET PG Counselling 2021 latest news in Marathi नवी दिल्ली: नीट पीजी समुपदेशन कार्यक्रम 2021 संदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता 5 जानेवारी म्हणजेच उद्या होणार आहे. ईडब्ल्यूएस कोट्यातील आरक्षणाबाबत उत्पन्न मर्यादा निश्चित करताना केंद्राच्यावतीनं या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याप्रकरणी सरन्यायाधीश एन वी रमणा यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, सरन्यायाधीश एन वी रमणा यांनी या प्रकरणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात येईल, असं सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणावरील सुनावणी उद्या होणार आहे.

केंद्र सरकारकडून 8 लाख उत्पन्न मर्यादेचं समर्थन

नीट पीजी मधील ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी ओबीसी प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादा कशी निश्चित करण्यात आली असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला होता. त्यावर केंद्राकडून आठ लाख उत्पन्न मर्यादेचं समर्थन करण्यात आलं होतं. आठ लाख रुपयांची उत्पन्न निश्चित करताना केंद्रानं नव्या अटी जाहीर केल्या आहेत.

पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असणारे ईडब्ल्यूएससाठी अपात्र

आठ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. पाच एकर शेतजमीन किंवा त्याहून अधिक शेतजमीन असणारे शेतकरी कुटुंब, अधिसूचित नगरपालिका आणि महापालिकांमधील 100 चौ. फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा प्लॉट आणि अधिसूचित नसलेल्या नगरपालिकांमधील 200 चै. फूट प्लॉट नावावर असणारे व्यक्ती आणि ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील घर असेल त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही.

नीट समुपदेशनाबाबत आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट समुपदेशन प्रक्रिया 6 जानेवारी 2022 पासून सुरु करण्याचं आश्वासन दिलं होत. मात्र, नीट पीजी मधील ईडबल्यूएस आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरु असल्यानं त्यासंदर्भात नेमका काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं आता काय निर्णय येणार हे पाहावं लागणार आहे. कोरोना संसर्ग आणि इतर कारणांमुळं नीट पीजी परीक्षा 2021 अगोदर 8 महिने उशिरा झाली आहे. नीट पीजी समुपदेशन व्हावं म्हणून ज्युनिअर डॉक्टर संपावर देखील गेले होते.

ईडब्ल्यूएस आरक्षणाप्रकरणी यापूर्वी सुनावणी न्यायमूर्ती डी. वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांच्या बेंचसमोर झाली होती.

इतर बातम्या:

EWS साठी 5 एकराच्या अटीनं नवं संकट; मराठवाडा विदर्भ ते उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांना फटका, वाचा सविस्तर

Uday Samant : कोरोना रुग्णांमध्ये वाढ, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? आज फैसला; उदय सामंत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

NEET PG Counselling 2021 ews obc reservation supreme court hearing latest news in Marathi

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.