NEET UG Cut-Off 2022: चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी किती मार्क्स लागतील? यावर्षीचा कट ऑफ काय असू शकतो?

NEET Cut-Off 2022: गेल्या अनेक वर्षांचे निकाल आणि प्रवेशाच्या आधारे तज्ज्ञांनी नीट यूजीच्या कट ऑफची (NEET Cut-Off) माहिती दिली असून, त्यात देशातील टॉप कॉलेजमध्ये कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी किती गुण लागतात याची माहिती देण्यात आलीये.

NEET UG Cut-Off 2022: चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी किती मार्क्स लागतील? यावर्षीचा कट ऑफ काय असू शकतो?
NEET PG CounsellingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 9:58 AM

NEET UG Cut-Off 2022: National Eligibility Entrance Test-Undergraduate (NEET UG 2022) परीक्षा 17 जुलै रोजी संपली आहे. विद्यार्थ्यांना आता आन्सर की आणि निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. एनटीएने जाहीर केलेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे. देशातील टॉप कॉलेजमध्ये (Medical Top College) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किती गुण मिळवावे लागतील याबद्दल बोलूयात…गेल्या अनेक वर्षांचे निकाल आणि प्रवेशाच्या आधारे तज्ज्ञांनी नीट यूजीच्या कट ऑफची (NEET Cut-Off) माहिती दिली असून, त्यात देशातील टॉप कॉलेजमध्ये कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी किती गुण लागतात याची माहिती देण्यात आलीये.

टॉप स्कोरर्सच्या यादीत येणं बंधनकारक

या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी टॉप स्कोरर्सच्या यादीत येणं बंधनकारक आहे, या परीक्षेसाठी दरवर्षी क्वालिफाइंग मार्क्स वेगवेगळे असतात. हे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाइलवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना समुपदेशनाद्वारे आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल, पण आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुणही चांगले असावेत. सरकारी कॉलेजमध्ये कमी फीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर टॉप स्कोरर्सच्या यादीत येणं बंधनकारक आहे. यावेळी कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्याला कोणत्या गुणावर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो बघुयात…

तज्ज्ञांच्या मते

सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 15 टक्के अखिल भारतीय कोट्याअंतर्गत शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 650 पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतील. त्याचबरोबर राज्य कोट्यातील 85 टक्के जागांवर 620 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

OBC, SC ST कट ऑफ असाच राहू शकतो

ओबीसी, एससी आणि एसटीचा कट ऑफ असाच राहू शकतो, तर एआयक्यूच्या जागांसाठी 640 आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या जागांसाठी 600 पर्यंत गुण मिळू शकतो. त्याच वेळी, अनुसूचित जाती (एससी) च्या विद्यार्थ्यांना कौन्सिल प्रक्रियेअंतर्गत सरकारी महाविद्यालयांमध्ये जागा मिळविण्यासाठी एआयक्यू अंतर्गत सुमारे 450 आणि राज्य कोट्याअंतर्गत 385 गुण मिळवावे लागतील. तसेच अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना एआयक्यूच्या जागांसाठी सुमारे 400 आणि राज्य कोट्यातील जागांसाठी 370 गुण मिळवावे लागणार आहेत.

कटऑफ

पात्र ठरण्यासाठी परीक्षा एकूण 720 गुणांची होती. पात्र ठरण्यासाठी अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांपर्यंत गुण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्क्यांपर्यंत गुण मिळवावे लागतात. तज्ज्ञांच्या कटऑफवरचे हे मत गेल्या अनेक वर्षांतील निकाल आणि प्रवेशाच्या आधारे देण्यात आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.