AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांना दिलासा, आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार

शाळेचा दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होते. (Now Student Get admission in another school without leaving certificate)

विद्यार्थ्यांना दिलासा, आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:10 AM

मुंबई : एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) शिवाय प्रवेश दिला जाणार आहे. नुकतंच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) याबाबतचा निर्णय जारी केला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मतारखेचा दाखल्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Now Student Get admission in another school without leaving certificate Maharashtra Education Department order)

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी

सध्या कोरोना काळात निर्बंध, बंद पडलेले व्यवसाय आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरता आलेले नाही. त्यामुळे अनेक शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नाकारत आहेत. शाळेचा दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होते. तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.

निर्णयात नेमकं काय?

आरटीईच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा हक्क असतो. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्याही शासकीय, महापालिका, नगरपालिका किंवा खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत इयत्ता 9 वी किंवा दहावी वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना T.C (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच पूर्वीच्या शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट प्राप्त न झाल्यात संबंधित शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला वयानुसार वर्गात प्रवेश दिला जावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यामुळे कोणताही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडीत होऊन तो शाळाबाह्य होणार नाही, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, आता विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखल्याची गरज भासणार नाही. तसेच शाळेत प्रवेश मिळत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई

त्याशिवाय ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना TC शिवाय प्रवेश नाकारतील किंवा जर प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. (Now Student Get admission in another school without leaving certificate Maharashtra Education Department order)

संबंधित बातम्या : 

SSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा

MHT CET Exam: महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

HSC Exam Cancelled: बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा, परिपत्रक जारी

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.