AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NTA NEET 2021 : एनटीएकडून नीट यूजी परीक्षेची नमुना OMR प्रकाशित, मार्गदर्शक सूचना जारी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीनं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 (NEET UG 2021) परीक्षेची नमुना ओएमआर जारी केली आहे.

NTA NEET 2021 : एनटीएकडून नीट यूजी परीक्षेची नमुना OMR प्रकाशित, मार्गदर्शक सूचना जारी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 5:27 PM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीनं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 (NEET UG 2021) परीक्षेची नमुना ओएमआर जारी केली आहे. 12 सप्टेंबर रोजी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एनटीएनं परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्र जाहीर केल्यानंतर आता नमुना ओमएमआर जाहीर करुन ती कशी भरायची या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. एनटीए परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं 202 शहरांमध्ये देशात आणि परदेशात होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट यूजी परीक्षा देणारे विद्यार्थी neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊन पीडीएफ स्वरुपातील नमुना ओएमआर पाहू शकतात.

ओएमआरसंबंधी मार्गदर्शक सूचना

ओएमआर वरील वैयक्तिक तपशील आणि गोल रंगवण्यासाठी काळ्या शाईचा ब्लॅक बॉल पाईंट पेन वापरा. उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करुन नका. विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलेल्या माहितीशिवाय इतर कोणतीही माहिती भरु नये, खाणाखूणा करु नयेत. ओएमआरवर दिलेल्या ठिकाणी विहित ठिकाणी तुमचं नाव भरा. उत्तर पत्रिकेवरील घोषणापत्राखाली तुमची सही करा. नीट प्रश्नपत्रिकेवरील बुकलेट कोड, बुकलेट क्रमांक नोंदवण्यास विसरु नका. एका उत्तरासाठी अधिक पर्याय नोंदवून नका. अधिक माहितीसाठी नीट एनटीएच्या ईमेलवर संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे.

अ‌ॅडमिट कार्ड 09 सप्टेंबरला जारी होणार

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. तर, एनटीए नीट यूजी परीक्षेची परीक्षा केंद्र जाहीर केली आहेत.

नीट यूजी प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीएची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी स्टेप 2 : वेबसाईटवरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावं स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि पासवर्ड दाखल करावा स्टेप 4 : प्रवेशपत्र ओपन होईल ते डाऊनलोड करुन सोबत ठेवावं

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

शिक्षण क्षेत्राच्या पावित्र्याला गालबोट, अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार, शिक्षक आमदार किशोर दराडेंचा आरोप

NTA released sample omr sheet and guidelines before exam NEET UG 2021

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....