NTSE Exam: नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, अंतिम उत्तर तालिका जाहीर
नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएसई) च्या दुसर्या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) स्टेज 2 मधील परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. NTSE Exam Final Answer Key

नवी दिल्ली: नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएसई) च्या दुसर्या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) स्टेज 2 मधील परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. एनटीएसईनं उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेची ओएमआर उत्तरपत्रिकेची प्रत जाहीर केली आहे. उमेदवारांनी निकालासाठी वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (NTSE Exam Final Answer Key Released by National Council for Education Research and training result declare on 10 July)
नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँण्ड ट्रेनिंग (एनसीईआरटी) ने अधिकृत वेबसाईट ncert.nic.in वर एनटीएसई स्टेज २ मधील मेंटल अॅबिलिटी टेस्ट (MAT) आणि स्कॉल्टिक एबिलिटी टेस्ट (SAT)च्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत.
10 जुलैला निकाल जाहीर
एनसीईआरटीतर्फे स्टेज 2 परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेतली होती. यानंतर परिषदेने 19 मे 2021 रोजी नोटीस या संदर्भातील नोटीस जाहीर केलं होतं. त्यानुसार फेज 2 च्या अंतिम उत्तरतालिका आणि विद्यार्थ्यांच्या ओएमआर 15 जून 2021 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. एनटीएई फेज 2 चा निकाल 10 जुलै 2021 रोजी जाहीर केला जाईल.
उत्तर तालिका कशी डाऊनलोड करायची?
एनटीएसई स्टेज 2 मानसिक क्षमता चाचणी अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार एनसीईआरटी वेबसाइट ncert.nic.in वर भेट देऊ शकतात. त्यानंतर होमपेजवरील मानसिक क्षमता चाचणी आणि स्कोलास्टिक अॅबिलीटी टेस्ट लिंकवर क्लिक करा. यानंतर अंतिम उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. उमेदवार ही पीडीएफ फाईल प्रिंट करू शकतात आणि त्याची सॉफ्ट कॉपीही जतन करुन ठेऊ शकतात.
नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा काय?
नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा ही भारतीय विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी योजना आहे. गेल्या शालेय शैक्षणिक वर्षातील परीक्षेत 60 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी या परीक्षेत सहभाग घेऊ शकतात. ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली जाती. पहिला टप्पा राज्यस्तरावर होतो. जे एनटीएसई संबंधित परीक्षा नियामक मंडळ किंवा विविध राज्यात राज्य मंडळाद्वारे आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसर्या टप्प्यात स्टेज 2 परीक्षेस बसतात. दुसरा टप्पा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आयोजित करतो. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. दहावीत शिकणारे विद्यार्थी राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेस बसतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याला दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती दिली जाते.
संबंधित बातम्या:
NTSE Exam Final Answer Key Released by National Council for Education Research and training result declare on 10 July