NIOS ODE 2021 : ओपन स्कूल दहावी आणि बारावीची ऑन-डिमांड परीक्षा 17 ऑगस्टपासून; जाणून घ्या सविस्तर तपशील
एनआयओएसने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की 10 वी आणि 12 वीच्या ऑन-डिमांड परीक्षांसाठी(ओडीई) अर्ज प्रक्रिया 02 ऑगस्टपासून सुरू होईल.
NIOS ODE 2021 नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंगमार्फत (एनआयओएस) ऑगस्टमध्ये 10 वी आणि 12 वीसाठी ऑन-डिमांड परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाचा कमी झालेला संसर्ग लक्षात घेऊन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंगने परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केली आहे. 17 ऑगस्टपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. (Open School X and XII on-demand examinations from 17th August; know the details)
ओडिशा बोर्डानंतर आता ओपन स्कूल बोर्डानेही विशेष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एनआयओएसने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की 10 वी आणि 12 वीच्या ऑन-डिमांड परीक्षांसाठी(ओडीई) अर्ज प्रक्रिया 02 ऑगस्टपासून सुरू होईल. या परीक्षा 17 ऑगस्टपासून घेण्यात येतील. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंगने ट्विट करून यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
नुकताच जाहीर झालेला निकाल
अलिकडेच नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे (एनआयओएस) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. एनआयओएसच्या संचालकांनी जाहीर केलेल्या निकालानुसार 10 वीच्या वर्गात 1.18 लाख परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. यामध्ये 75,637 मुले आणि 42,217 मुलींचा समावेश होता. तसेच 15 तृतीयपंथीय होते. त्यापैकी 1,07,745 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 68,416 मुले आणि 39,314 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचवेळी परिक्षेला बसलेले सर्व 15 तृतीयपंथीय परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
असे करण्यात आले मूल्यांकन
एनआयओएसमार्फत जारी केलेल्या मूल्यांकन निकषानुसार, जे विद्यार्थी आधीच चार किंवा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या निकालाची गणना करण्यासाठी एकाच अभ्यासक्रमातील तीन विषयांपैकी सर्वोत्तम विषयांची सरासरी घेण्यात आली. तसेच दोन किंवा तीन विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची गणना करण्यासाठी शेवटच्या दोन विषयांच्या सर्वोत्तम कामगिरीची सरासरी लक्षात घेतली गेली.
प्राचार्यांनी दिलेली माहिती
प्राचार्य शशी माथूर यांनी सांगितले की, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (सीआयटीएस) अंतर्गत अभ्यासक्रमांमध्ये अखिल भारतीय सामान्य प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाईल. यासाठी 20 आणि 21 ऑगस्ट या तारखा निश्चित केल्या आहेत. देशभरातील विविध केंद्रांवर होणाऱ्या सीबीटी (ऑनलाईन) प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी पात्र उमेदवारांनी वेबसाइटद्वारे प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Open School X and XII on-demand examinations from 17th August; know the details)
इंपिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया राज्याच्या शासकीय यंत्रणेमार्फत राबवा, समता परिषदेची राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी https://t.co/srnAJCG0kX @ChhaganCBhujbal @VijayWadettiwar @Pankajamunde @cbawankule @Dev_Fadnavis #OBCReservation #SamataParishad #ImpericalData #OBC
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
इतर बातम्या
IAS Transfer : राज्यातील आणखी 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?