AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pariksha Pe Charcha कार्यक्रमाची तारीख ठरली, नरेंद्र मोदींकडून घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2022 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम शुक्रवारी 1 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

Pariksha Pe Charcha कार्यक्रमाची तारीख ठरली, नरेंद्र मोदींकडून घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: Narendra Modi Twitter
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 8:57 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2022 (Pariksha Pe Charcha 2022) हा कार्यक्रम शुक्रवारी 1 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. परीक्षा पे चर्चा गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चला परीक्षांचा महोत्सव साजरा करुया. तणावरहित परीक्षांची चर्चा करुयात. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 1 एप्रिलला पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबरच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) मधून देशाला संबोधित केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं होतं.

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम कुठं होणार?

कोरोना विषाणू संसर्गामुळं गेल्या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

मन की बात कार्यक्रमात केलेले नोंदणीचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबरच्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं होतं. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना त्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे होतं. 28 डिसेंबरपासून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची नोंदणी सुरु झाली होती.

परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं.परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी करुन घेण्यात येत आहे.

इतर बातम्या :

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

देशात प्रथमच पुण्यात ॲल्युमिनिअमचे मेट्रो कोचेस धावणार, मेक इन इंडियाचे स्वप्न साकार

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....