पॉलिटेक्निकसाठी सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांनुसार प्रवेश, उदय सामंत यांची माहिती
इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (polytechnic admission 2021 uday samant)
सांगली : इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. मात्र दुसर्या बाजूला इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटी परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आगामी काळात ही सीईटी घेतली जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. (Polytechnic admission 2021 will be on 10th class marks said Uday Samant)
पॉलिटेक्निकसाठी प्रवेशी परीक्षा नाही
उदय सामंत आज (7 जून) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी सामंत यांनी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणि इतर बाबींवर भाष्य केले. “दहावीनंतर विद्यार्थ्यांचे गुण आणि निकाल प्रमाणपत्र पाहून त्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच यावेळी या विद्यार्थ्यांची कोणतीही प्रवेश परीक्षा होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रोफेशनल कोर्सेसाठी सीईटी होईल
तसेच पुढे बोलताना त्यांना राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवरही भाष्य केले. “प्रोफेशनल कोर्सेससाठी सीईटी होईल. त्यासाठी आगामी काळात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता समोर ठेऊनच हा निर्णय होईल,” असे सामंत म्हणाले.
बीए, बी कॉमसाठी प्रवेश परीक्षा असा कोणताही निर्णय नाही
दरम्यान, त्यांनी सध्या राज्यात पसरत असलेल्या अनेक अफवांवर बोट ठेवले. सध्या बीए, बीकॉम या तसेच इतर विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा प्रवेश परीक्षा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बारावी वर्गाचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेवर विचार करण्यात येईल, असे सामंत म्हणाले. तसेच कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना जी प्रमाणपत्रं मिळणार आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.
Video | Uday Samant | नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ : उदय सामंत @samant_uday #UdaySamant #NanarProject #Ratnagiri pic.twitter.com/mcRXXErohz
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
इतर बातम्या :
प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय कधी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणतात…
(Polytechnic admission 2021 will be on 10th class marks said Uday Samant)