SSC 10th Result 2022 : उद्या दहावीचा रिझल्ट, निकाल कुठे पाहाल?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
SSC Result 2022 Maharashtra Board : या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती.
मुंबई: इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता दहावीच्या (SSC Results) निकालाची प्रतिक्षाही अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर, संगणकावर किंवा लॅपटॉपवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये (Maharashtra Board 10th Results) ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.
कुठे पाहाल निकाल
21 हजार परीक्षा केंद्रातून होती परीक्षा
कोरोना संकटानंतर प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. त्यासाठी 21 हजार 384 परीक्षा केंद्रे होती. यात 5 हजार 50 परीक्षा केंद्रे मुख्य होती. तर 16 हजार 344 ही उपकेंद्रे होती.
16 लाख विद्यार्थी
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 38 हजार 172 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ दिला
दरम्यान, या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती. परीक्षा केंद्रात गैरप्रकार होऊ नये म्हणून चित्रीकरण करण्यात आले होते. या शिवाय भरारी पथके आमि महिलांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी समूपदेशकही तैनात ठेवण्यात आले होते.