SSC 10th Result 2022 : इयत्ता दहावीच्या निकालात मुलींची बाजी, कोकणही सरस; यंदाचा निकाल 96.94 टक्के

SSC 10th Result 2022 : या शिवाय राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण 24 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

SSC 10th Result 2022 : इयत्ता दहावीच्या निकालात मुलींची बाजी, कोकणही सरस; यंदाचा निकाल 96.94 टक्के
CUET PG Admit CardImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:11 PM

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Results) अखेर लागला आहे. यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. या निकालात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा (konkan) निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे. तर विभागात नाशिकचा (nashik) सर्वात कमी निकाल लागला आहे. या शिवाय राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय 66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच ऑनलाईनच रिझल्ट डाऊनलोड करून घेता येणार आहे.

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईन पार पडली. पहिल्यांदा परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात आली. कोरोनामुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. एकूण 66 विषयाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. इयत्ता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या परीक्षेत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानुसार दहावीचा निकाल लागला असून मुलींनीच आपणच अजिंक्य असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोकण सरस

यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागला आहे. तर कोल्हापूरनेही या निकालात चांगली कामगिरी केली आहे. कोल्हापूरचा निकाल 98.50 टक्के इतका लागला आहे.

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का अधिक

राज्यातून 6 लाख 50 हजार 779 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. तर 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह आणि 42 हजार 170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विभागवार निकाल

कोकण 99.27 कोल्हापूर 98.50 लातूर 97.27 नागपूर 97.00 पुणे 96.96 मुबंई 96.94 अमरावती 96.81 औरंगाबाद 96.33 नाशिक 95.90

कुठे पाहाल निकाल

tv9marathi.com

https://www.mahahsscboard.in/

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.