बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली, कोर्टानं केंद्राला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. (Supreme Court CBSE ICSE exam)
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. (Supreme Court gave two week time to Centre for making of class 12th result framework)
केंद्राकडून याचिका रद्द करण्याची मागणी
सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली. ममता शर्मा यांच्या याचिकेतील मागणी मंजूर झाली आहे, त्यांची याचिका रद्द करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली. मात्र, सुप्रीम कोर्टानं बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, अशी विचारणा केंद्राला केली. त्यावर निकाल कसा जाहीर करणार हे सीबीएसई ठरवेल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं.
बारावीचा निकाल कसा लावणार सांगा? याचिका रद्द करु
सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी निकष ठरवण्यात आले असतील तर कोर्टापुढं सादर करा, याचिका निकाली काढू असं म्हटलं. यावर आयसीएसईच्या वकिलांनी 4 आठवड्यांची वेळ मागितली. सुप्रीम कोर्टानं केंद्राची बाजू आणि आयसीएसईची बाजू ऐकून घेत 2 आठवड्यांची मुदत दिली. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता.मात्र, दोन आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे निर्णय घेण्यास वेळ होता, आता दोन आठवड्यामध्ये निकष जाहीर करा असं म्हटलं.
ममता शर्मा काय म्हणाल्या?
याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी अजून काही राज्य परीक्षा बोर्डांचा निर्णय झालेला नाही. राज्य बोर्डांनी सुद्धा बारावी परीक्षांसदर्भात एकसारखा निर्णय घ्यावा असं म्हटलं. यावर कोर्टानं बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निकष सादर झाल्यावर याबाबत समजेल. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, ते सीबीएसईचे असोत, आयसीएसईचे असोत किंवा राज्य बोर्डांचं असोत, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले.
केंद्र सरकारकडून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द
सुप्रीम कोर्टाकडून मागून घेतलेल्या वेळेमध्ये केंद्र सरकारनं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात या निर्णयाची माहिती दिली गेली.
Bench: Objective criteria to asses the students be placed in 2 weeks. List matter after two weeks. #CBSE #ICSE #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) June 3, 2021
संबंधित बातम्या
जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ चित्रपट अडचणीत, रा. स्व. संघाच्या बदनामी प्रकरणी निर्मात्यांना नोटीस
(Supreme Court gave two week time to Centre for making of class 12th result framework)