AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET Scam: शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक टीईटी प्रकरणात पुढील कारवाई करतील, शरद गोसावी यांचं वक्तव्य

याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान याचसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, मार्च 2019 मध्ये झालेल्या टिईटी परिक्षेचा निकाल 2020 ला लागला होता.

TET Scam: शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक टीईटी प्रकरणात पुढील कारवाई करतील, शरद गोसावी यांचं वक्तव्य
TET Exam Scam
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 1:15 PM

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Scam) घोटाळा! या घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादित असल्याचे समोर आले.आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची ही नावं आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान याचसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) म्हणाले, मार्च 2019मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेचा निकाल 2020 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील.

काय म्हणाले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी?

  • मार्च 2019 मध्ये झालेल्या टिईटी परिक्षेचा निकाल 2022 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
  • शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील
  • 293 जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली
  • 2021 मध्ये घोटाळा उघड झाला. ज्यात 7 हजार 880 संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची संपादणूक रद्द केली.

माझ्या मुलींनी 2020 मध्ये टीईटीची परीक्षा दिली- अब्दुल सत्तार

आत्ता जी टीईटी घोटाळ्यातली यादी जाहीर करण्यात आली आहे ती यादी 2019 मध्ये जी टीईटीची परीक्षा झाली आहे, त्या विद्यार्थ्यांची आहे. माझ्या मुलींनी 2020 मध्ये टीईटीची (TET) परीक्षा दिली होती. असं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलं आहे. त्याचबरोबर जर माझ्या मुली त्या या परीक्षेत अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव कसे आले असा सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. तसेच यासंबंधात जर माझ्या संस्थेकडून शिक्षण विभागाला किंवा कोणाला एखादे साधे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं आहे की, हा माझ्या बदनामीचा कट असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी प्रशासनातर्फे करत आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.