AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा साळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा साळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 12:10 AM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्षण करुन ही यादी जाहीर केली आहे. या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, आदी मान्यवरांनी या शाळांचे कौतुक केले आहे.

शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा दोन शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन 2021-2022(Education World School Ranking of Govt. Schools in India) या उपक्रम अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.

मुंबईतील दोन शाळा देशातील टॉप टेन शाळांमध्ये

सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षण अंती निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.

दोन शाळांचा जागतिक पातळीवर सन्मान

दरम्यान, हवामान कृती आराखड्यासाठी देखील सप्टेंबर 2021 मध्ये या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. या अनुषंगाने या शाळांनी या उपक्रमावर काम करण्यास सुरुवात केली. जागतिक व राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाबाबत सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच या हवामान बदल उपक्रमामध्ये कार्यरत असलेल्या किंवा सहभागी असलेल्या परदेशांतील विविध शाळांशी संपर्क करून उपक्रम व प्रकल्पांबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. या सर्व उपक्रमांसाठी एकूण 3 आठवडे एवढा कालावधी होता. या उपक्रमामध्ये जागतिक स्तरावर सहभागी शाळांपैकी सीबीएसई हरियाली व्हिलेज व सीबीएसई काणे नगर शाळांची निवड झाली असून त्यांचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग व मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा या दोन शाळांनाही यामध्ये सहभागी झाल्याबाबत गौरविण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Farm Laws : पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मागावी- संजय राऊत

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान

आंदोलन नेतृत्वहीन, चर्चा नेमकी कुणाशी करायची? अनिल परबांचा सवाल; खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.