AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, 17 ऑक्टोबरपासून परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट परीक्षा 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती.

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, 17 ऑक्टोबरपासून परीक्षा
EXAM
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:41 PM

नवी  दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट परीक्षा 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.

नेट परीक्षा वेळापत्रकात बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन पहिल्यांदा 6 ऑक्‍टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार होते. नेट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले आहेत. आता परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

परीक्षेच्या तारखा का बदलण्यात आल्या?

10 ऑक्टोबरला म्हणजेच आज यूपीएससीच्या परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही बाब एनटीएच्या लक्षात आणून दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यानंतर यूजीसी नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

UGC NET 2021 Admit Card डाऊनलोड कसं करावं?

स्टेप 1 : UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

स्टेप 2 : होमपेजवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सुरक्षा कोड नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या.

कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर

देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

इतर बातम्या

Nobel Prize 2021: मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना शांततेचं नोबेल जाहीर, स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारितेवर नोबेलची मोहोर

Nobel Prize: कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना जाहीर, रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीकडून घोषणा

UGC NET 2021 exam postpone again by National Testing Agency exam conduct between 17 to 25 October

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....