UPSC ES Pre Exam 2021: इंजीनियरिंग सर्विसेसच्या पूर्व परीक्षेची तारीख घोषित, व्हॅकन्सी डिटेल्स ते परीक्षा केंद्र, वाचा सविस्तर..
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. | UPSC ES preliminary Exam 2021 Date Announced By UPSC

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अभियांत्रिकी सेवा (UPSC ES Pre Exam 2021) ची पूर्व परीक्षा 18 जुलै 2021 रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना पाहू शकतात. (UPSC ES preliminary Exam 2021 Date Announced By UPSC)
अभियांत्रिकी सेवा परीक्षेची अधिसूचना 7 एप्रिल 2021 रोजी यूपीएससीने जारी केली. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 27 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता पूर्व परीक्षेची तारीख (UPSC ES Pre Exam 2021) जाहीर करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जुलै महिन्यात जारी केलं जाईल. परंतु, अद्यापपर्यंत मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
व्हॅकन्सी किती?
जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 215 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल. यात सिव्हिल इंजिनियरिंग, मॅकेनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या शाखांसाठीच्या पदांचा समावेश आहे. आयोगाने परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. व्हॅकन्सीच्या संपूर्ण डिटेल्ससाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहावं . अधिकृत नोटिस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या कोणत्या केंद्रावर परीक्षा होणार?
केंद्रीय लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा पूर्वा परीक्षा अगरताळा, अहमदाबाद, आइजोल, अलीगड, अलाहाबाद, बंगळुरु, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, धारवाड, गुवाहाटी, गंगटोक, हैदराबाद, इम्फाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनऊ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलांग, शिमला, श्रीनगर, त्रिवेंद्रम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे घेण्यात येईल.
मुख्य कोणत्या केंद्रावर परीक्षा होणार?
केंद्रीय लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. अहमदाबाद, आइजोल, अलाहाबाद, बंगळुरु, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, दिसपूर, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना, रायपूर, रांची, शिल्लॉंग, शिमला, त्रिवेंद्रम आणि विशाखापट्टणम येथे घेण्यात येईल.
(UPSC ES preliminary Exam 2021 Date Announced By UPSC)
हे ही वाचा :
CBSE Board 12th Result 2021: सीबीएसई बारावी बोर्डाच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, असे मिळणार मार्क!