UPSC Topper 2021: रे बन्दे की मेहनत को किस्मत का सादर प्रणाम है प्यारे! UPSC टॉपर म्हणते, ‘मेहनतच! पर्याय नाही’

अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती.

UPSC Topper 2021: रे बन्दे की मेहनत को किस्मत का सादर प्रणाम है प्यारे! UPSC टॉपर म्हणते, 'मेहनतच! पर्याय नाही'
UPSC Topper श्रुती शर्माImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 5:19 PM

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल जाहीर (UPSC Final Result) करण्यात आलाय आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारलीये! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक (All India Topper Shruti Sharma) पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती. दुसऱ्या क्रमांकावर असलेली अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal UPSC) इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. यासह, तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमीकडून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली.

जामिया मिलिया कोचिंग अकादमीचे 23 उमेदवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) यासह अन्य पदांसाठी दरवर्षी तीन टप्प्यांत नागरी सेवा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत जामिया मिलिया कोचिंग अकादमीचे 23 उमेदवार यशस्वी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

जामियाला श्रेय

टॉपर बनल्यानंतर श्रुती शर्माने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अॅकॅडमीला दिलं आणि म्हटलं की, मी इथे नसते तर कदाचित मी टॉपर झाले नसते.

यशाच्या टिप्स

  • यशासाठी कठोर परिश्रमाशिवाय दुसरा मार्ग नाही. कठोर परिश्रम करा।
  • अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा.
  • जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. यामुळे तुम्हाला तुमच्यातील उणिवा कळतील.
  • गेल्या वर्षीचा पेपर सोडवा.
  • कोचिंगमध्ये अभ्यास करणे पुरेसे नाही. स्वयंअध्ययन करा .
  • इतरांना दाखवण्यासाठी एखादं पुस्तक उघडू नका. तुम्ही किती तयारी केली आहे हे स्वतःला विचारा.

टॉप 10 मध्ये असणाऱ्या उमेदवारांची नावं

  1. श्रुति शर्मा
  2. अंकिता अग्रवाल
  3. गामिनी सिंगला
  4. ऐश्वर्या वर्मा
  5. उत्कर्ष द्विवेदी
  6. यक्ष चौधरी
  7. सम्यक एस जैनी
  8. इशिता राठी
  9. प्रीतम कुमार
  10. हरकीरत सिंह रंधावा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.