JEE MAIN : जेईई मेन परीक्षांची तारीख बदलली, असं करा रजिस्ट्रेशन
वेळापत्रकातील हा बदल IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून करण्यात आलेला आहे. जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA) ने जेईई (JEE) मेन 2022 सत्र -1 च्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची बातमी. जेईई मेन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. वेळापत्रकातील हा बदल IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून करण्यात आलेला आहे. जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती पण आता ही परीक्षा 20,21, 22, 23, 24,25 , 26, 27, 28 आणि 29 जून 2022 ला आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या सत्रातली परीक्षा आधी 21,24,25,29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती पण आता ही परीक्षा 21,22,23,24,25, 26, 27, 28,29 आणि 30 जुलै रोजी आयोजित केली जाईल.
पहिल्या सत्रासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आत्तापर्यंत संपली आहे. जेईई मेन 2022 च्या दुसऱ्या सत्रासाठीचे ऑनलाईन अर्ज लवकरच उपलब्ध होतील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी NTA कडून विद्यार्थ्यांना www.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ताज्या माहितीसाठी https://jeemain.nta.nic.in या लिंकवर जाण्याचंही सांगण्यात आलंय. जेईई संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी 011-40759000/011-69227700 वर देखील संपर्क करू शकतात. त्याचबरोबर jeemain@nta.ac.in वर देखील ईमेल करू शकतात.
JEE (Main)dates rescheduled to enable students across the country to prepare well for the exams. @dpradhanbjp @EduMinOfIndia pic.twitter.com/QYABHnd7SC
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
असं करा रजिस्ट्रेशन
स्टेप 1- सगळ्यात आधी ऑफिशिअल वेबसाईट Joint Entrance Examination (Main) | India (nta.nic.in) वर जा.
स्टेप 2 – होम पेजवर लेटेस्ट न्यू मध्ये जाऊन Registration for JEE (Main) 2022 च्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3 – नवीन पेज उघडलं जाईल. तिथे New Registretion ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 – मागितलेल्या माहितीच्या आधारे रजिस्ट्रेशन करून पासवर्ड सेट करा.
स्टेप 5 – आता जनरेट झालेल्या क्रेडेन्शियल्स च्या आधारे लॉग इन करा.
स्टेप 6- जेईई मेन 2022 चा अर्ज भरा आणि संबंधित अर्ज अपलोड करा.
स्टेप 7 – अर्जाची फी भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.
स्टेप 8- तुमचं जेईई मेन 2022 चं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
इतर बातम्या :