Corona | भारत, पाकिस्तानसह ‘या’ देशांनी शिक्षणावरील बजेट घटवलं: जागतिक बँक

कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव शिक्षण क्षेत्रावर (Education Sector) झाल्याचा खुलासा विश्व बँकेच्या (World Bank) रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

Corona | भारत, पाकिस्तानसह 'या' देशांनी शिक्षणावरील बजेट घटवलं: जागतिक बँक
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 4:45 PM

Education Budget Slashed in Many Countries नवी दिल्ली:  कोरोना विषाणू महामारीनं (COVID-19 Pandemic) जगभरात नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव शिक्षण क्षेत्रावर पडला. (Education Sector). विश्व बँकेच्या (World Bank) रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळं मध्यम उत्पन्न गटातील आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांनी शिक्षण क्षेत्राचं बजेट कमी केले आहे. शिक्षण क्षेत्रावरील बजेट (Education budget) मध्ये 65 टक्के कापत करण्यात आलीय. तर विकसित किंवा उच्च उत्पन्न गटातील देशांनी 33 टक्के बजेट कमी केले आहे. विश्व बँकेच्या रिपोर्टनुसार यूनेस्को ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (जीईएम) (UNESCO’s Global Education Monitoring) ही माहिती समोर आलीय. भारत आणि पाकिस्ताननं शिक्षण बजेटमध्ये कपात केली आहे.(World Bank Report said India Pakistan and other countries reduced education budget)

29 देशांच्या आकडेवारीचा अभ्यास

जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोरोना महामारीमुळे शिक्षणावर काय परिणाम झाला याचा अभ्यास करण्यासाठी 29 देशांमधील सर्व क्षेत्रातील आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. एकत्रित केलेल्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. या 29 देशातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जगातील शिक्षण घेणाऱ्या 54 टक्के इतकी आहे. यानंतर जागतिक बँकेच्या टीमनं 29 देशांमधील या आकडेवारीची पडताळणी केली. ज्यावेळी शिक्षण क्षेत्राला अधिक निधीची गरज होती त्यावेळी त्यामध्ये कपात आल्याचं निरीक्षण जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

शिक्षण क्षेत्राला अधिक बजेटची गरज

अहवालात दिलेल्या माहितीनुसार शाळा आणि महाविद्यालंयाकडून कोरोनापासून वाचण्यासाठी प्रयत्न केले गेले. कोरोनापासून नुकसान होऊन नये यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षण क्षेत्राला अधिक बजेटची गरज आहे. मात्र, यावेळीच बजेट कापण्यात आलं. अफगानिस्तान, इथियोपिया, यूगांडा, बांग्लादेश, मिस्र, भारत, केनिया, किर्गिज गणराज्य, यूक्रेन, मोरक्को, म्यांमार, नेपाल, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाईन्स, तंजानिया आणि उजबेकिस्तान या देशांनी शिक्षण क्षेत्रावरील बजेट कमी केलं आहे.

अर्जेंटिना, ब्राझिल, कोलंबिया, जॉर्डन, इंडोनेशिया, कझाकिस्तान, मेक्सिको, पेरु, रशिया, तुर्की चीन आणि पनामा या उच्च मध्य उत्पन्न (Upper Middle Income Countries) गटातील देशांनी शिक्षणावरील बजेट कमी केलं आहे.

शिक्षणासाठी दहा टक्क्यांपेक्षा कमी बजेट असणारे देश

अर्जेंटिना, ब्राझिल, मिस्र, भारत, म्यानमार, नायजेरिया, पाकिस्तान आणि रशिया या देशांमध्ये शिक्षण क्षेत्राचं बजेट दहा टक्केंपेक्षा कमी आहे. साधारणपणे शिक्षण क्षेत्रावर किमान सहा टक्के तरतूद अर्थसंकल्पात असावी, असं म्हटलं जाते.

संबंधित बातम्या:

प्रियांका गांधींचं ‘मिशन आसाम’; आदिवासी नृत्यावर धरला ताल

गेल्यावर्षी मुंबई अंधारात का गेली? कुणी घातली? कोडं उलगडलं, न्यूयॉर्क टाईम्सचं सविस्तर वृत्त

(World Bank Report said India Pakistan and other countries reduced education budget)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.