भाजपला बंपर विजय कसा मिळाला? नरेंद्र मोदींनी सिक्रेट जगजाहीर केलं, विरोधक लक्ष देतील?
पक्षाच्या सर्व छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून विजयाचा चौका मारला आहे. एनडीएसाठी. मित्रांनो, उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. परंतु, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पुन्हा निवडून देण्याचं हे पहिलं उदाहरण आहे
मुंबई – पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये पंजाब (PUNJAB) वगळता इतर चार राज्यांध्ये भाजपचा (BJP) मोठा विजय झाला आहे. उत्तरप्रदेश, मणिपूर,उत्तराखंड या राज्यात भापाच राज्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.जपाचं बहुमत सिध्द झालं तर गोव्यात इतर पक्षांची मदत घेऊन भाजप तिथं सत्ता स्थापण करेल.
निवडणुकीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं
या निवडणुकीत भाग घेणाऱ्या सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्या निर्णयासाठी मी मतदारांचे आभार मानतो. विशेष करून माता भगिनींनी, तरुणांनी ज्या प्रकारे भाजपला भरपूर पाठिंबा दिला, तो एक मोठा संदेश आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी मतदानात भरपूर भाग घेऊन भाजपचा विजय निश्चित केला. त्यांबद्दल मला समाधान आहे. निवडणुकीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की यावेळी होळी १० मार्चपासून सुरू होईल. आपल्या कर्मठ कार्यकर्त्यांनी ही विजयी ध्वज फडकवला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो. त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांनी जनता जनार्दनांचं मन जिंकण्यास, त्यांचा विश्वास जिंकण्यास यशस्वी राहिले.
अथक परिश्रमातून विजयाचा चौका मारला
पक्षाच्या सर्व छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून विजयाचा चौका मारला आहे. एनडीएसाठी. मित्रांनो, उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. परंतु, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पुन्हा निवडून देण्याचं हे पहिलं उदाहरण आहे. उत्तर प्रदेशात ३७ वर्षानंतर एखादं सरकार दुसऱ्यांदा सलग सत्तेत आलं आहे. तीन राज्य यूपी, गोवा, मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या व्होटिंग टक्केवारीत वाढ झाली असल्याचे देखील त्यांनी जाहीर सभेत सांगितले.
सिक्रेट जगजाहीर केलं
गोव्यात सर्व एक्जिट पोल चुकीचे निघाले. जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. दहा वर्ष सत्तेत राहूनही राज्यात भाजपच्या जागेत वाढ झाली. उत्तराखंडमध्येही भाजपने नवा इतिहास रचला आहे. राज्यात पहिल्यांदा एखादा पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आला आहे. या राज्यांची आव्हाने वेगवेगळे आहेत. विकासाचे मार्ग वेगळे आहेत. पण भाजपावर विश्वास हे सूत्र या राज्यांचं समान आहे. भाजपची नीती आणि नियत आणि भाजपच्या निर्णयावर आपार विश्वास. देशात गरीबाच्या नावाने घोषणा खूप झाल्या. योजना बऱ्याच झाल्या. पण योजनांचे जे हक्कदार होते. ज्यांचा हक्क होता. त्यांना तो मिळावा, कोणत्याही त्रासाशिवाय मिळावा. त्यासाठी सुशासन, डिलिव्हरीचं महत्त्व असतं. पण भाजप ही गोष्ट जाणून आहे असं बोलून नरेंद्र मोदींनी सिक्रेट जगजाहीर केलं.