Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता
UP, Punjab, Uttarakhand, Goa and Manipur Election Exit Poll Results 2022 LIVE updates : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येणार यासंबंधीचे एक्झिट पोल थोड्याच वेळात जाहीर होणार आहेत.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार याचा अंतिम फैसला 10 मार्चला समोर येणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब (Punjab), गोवा आणि मणिपूर राज्यात कुणाचं सरकार येऊ शकतं यासंदर्भातील अंदाज सांगणारा एक्झिट पोल टीव्ही 9 नेटवर्क आणि पोलस्ट्रॅटच्यावतीनं जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, (Uttarakhand) गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदारांनी कुणाला कौल दिला याचा अंदाज एक्झिट पोलमधून पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशात भाजप, गोव्यात भाजप, मणिपूरमध्ये भाजप आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहयाला मिळेल. गोव्यात (Goa) भाजप आणि काँग्रेस, पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल, आपमध्ये टक्कर आहे. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यासह मणिपूरमध्ये (Manipur) काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे.
एक्झिट पोलचे लाईव्ह अपडेटस टीव्ही 9 मराठीवर पाहा
LIVE NEWS & UPDATES
-
गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा मिळणार : प्रमोद सावंत
गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा मिळणार : प्रमोद सावंत
BJP will get 18-22 seats in Goa & will form the govt. Our priority is to complete infrastructure projects of our double engine govt. As per exit polls also, BJP will return to power in UP, Uttarakhand, Goa and Manipur and will have good performance in Punjab: Goa CM Pramoगd Sawant pic.twitter.com/HuRso5HF7J
— ANI (@ANI) March 7, 2022
-
पाच राज्यांटे एक्झिट पोल काय सागंतात? भाजपची तीन राज्यात सरशी? आपला पंजाबमध्ये लॉटरी
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. बहुतांश एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. गोव्यातही भाजपचं मोठा पक्ष राहिल. मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल, अशी शक्यता आहे. तर, पंजाबमध्ये सत्तांतर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमध्ये आप सत्तेत येऊ शकतं. तर, उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवा सघर्ष होऊ शकतो.
-
-
पंजाब विधानसभा निवडणुकीचा महाएक्झिट पोल! आप होऊ शकतो सगळ्यात मोठा पक्ष
पंजाब विधानसभा निवडणुकीचा महाएक्झिट पोल! आप होऊ शकतो सगळ्यात मोठा पक्ष
पंजाब विधानसभा निवडणुकीचा महाएक्झिट पोल! आप होऊ शकतो सगळ्यात मोठा पक्ष तर काँग्रेसला मोठा फटका बसण्याची भीती? #ExitPoll #PunjabElection2022 @AamAadmiParty #AssemblyElections2022 pic.twitter.com/lyq1YcsWf0
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2022
-
उत्तरप्रदेशमध्ये कोण बाजी मारणार? भाजप की समाजवादी पार्टी
उत्तरप्रदेशमध्ये कोण बाजी मारणार? भाजप की समाजवादी पार्टी
उत्तरप्रदेशमध्ये कोण बाजी मारणार? काय सांगतो tv9 भारतवर्षचा Maha Exit Poll?#elections #mahaexitpoll #uttarpradesh #yogiadityanath #akhileshyadav pic.twitter.com/TYTrc23G5H
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2022
-
गोव्यात भाजप चालणार की काँग्रेस सत्ता खेचून नेणार?
गोव्यात भाजप चालणार की काँग्रेस सत्ता खेचून नेणार? काय सांगतो tv9 भारतवर्षचा Maha Exit Poll?
गोव्यात भाजप चालणार की काँग्रेस सत्ता खेचून नेणार? काय सांगतो tv9 भारतवर्षचा Maha Exit Poll?#MahaExitPoll #GoaElection pic.twitter.com/RBdjlC0TR1
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2022
-
-
उत्तराखंडमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार की काँग्रेसला निसटता पराभव मिळणार?
उत्तराखंडमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार की काँग्रेसला निसटता पराभव मिळणार? काय सांगतो tv9 भारतवर्षचा महाएक्झिट पोल
उत्तराखंडमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार की काँग्रेसला निसटता पराभव मिळणार? काय सांगतो tv9 भारतवर्षचा महाएक्झिट पोल#MahaExitPoll #UttarakhandElection pic.twitter.com/EPaz2H4fhn
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2022
-
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, आपची सरशी?
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाण्याती शक्यता आहे. पंजाबमध्ये आपला 56-61, तर काँग्रेसला 24-29 जागा मिळतील. शिरोमणी अकाली दलाला 22-26 जागा मिळतील. तर भाजपला 1-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
-
उत्तर प्रदेशात भाजपची सरशी? टीव्ही 9 पोलस्ट्रॅटचा सर्व्हे काय सांगतो
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आल्याची माहिती आहे. रिपब्लिक टीव्हीनं उत्तर प्रदेशात भाजपला 262-277 तर सपाला 119-134 तर बसपाच्या 07-15 जागा मिळतील. तर काँग्रेसला 03-08 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, टीव्ही 9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅटनं उत्तरप्रदेशात 211-225 जागा भाजपला तर, समाजवादी पक्षाला 146 ते 160 जागा मिळतील. तर बसपाला 14-24 तर काँग्रेसला 4-6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
-
UP Exit Poll Result : उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता?
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपची सत्ता?
भाजप : 211-225
सपा : 146-160
बसपा : 14-24
काँग्रेस : 4-6
-
Goa Exit Poll Result : गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता?
गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता
भाजप : 17 ते 19
काँग्रेस : 11 ते 13
आप : 1 ते 4
इतर : 1 ते 7
-
Uttarakhand Exit Poll Result : उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर
Uttarakhand Exit Poll Result : उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर
उत्तराखंडमध्ये
भाजपला 31-33
काँग्रेसला 33- 35
आप : 03
इतर : 02
एकूण जागा : 70
-
Punjab Exit Poll Result : पंजाबमध्ये कुणाचं सरकार? एक्झिट पोलचा कौल आम आदमी पार्टीकडे
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता आहे.
आपला 56-61,
काँग्रेसला 24-29,
शिरोमणी अकाली दलाला 22-26
भाजपला 1-6 आणि इतर पक्षांना 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
-
UP Exit Poll Update : उत्तर प्रदेशचा कौल कुणाला?
उत्तर प्रदेशचा कौल कुणाला?
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपसमोर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं आव्हान उभं केलं आहे. तर, बसपाच्या प्रचाराची धुरा मायावती यांनी सांभाळली, तर काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर होती. उत्तर प्रदेशच्या मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे.
-
कोणत्या राज्यात विधानसभेच्या किती जागा ?
कोणत्या राज्यात विधानसभेच्या किती जागा ?
उत्तर प्रदेश : 406
उत्तराखंड : 70
गोवा : 40
मणिपूर : 60
पंजाब : 117
-
उत्तर प्रदेशातील 7 व्या टप्प्याचं मतदान संपलं, एक्झिट पोल थोड्याच वेळात
उत्तर प्रदेशात आज सातव्या टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी 6 पर्यंत मतदान पार पडलं. थोड्याच वेळात एक्झिट पोल जाहीर केले जातील.
Published On - Mar 07,2022 6:08 PM